आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे महेंद्रसिंग धोनी यांच्याबद्दल माहिती मराठी भाषेत (Mahendra Singh Dhoni information in Marathi). महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावरील हा माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी महेंद्रसिंग धोनी यांच्यावर मराठीत माहिती (Mahendra Singh Dhoni biography in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या खेळामध्ये असेल्या प्रसिद्ध खेळाडूंची माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे, ते लेखसुद्धा आपण आपण वाचू शकता.
महेंद्रसिंग धोनी माहिती मराठी, Mahendra Singh Dhoni Information in Marathi
महेंद्रसिंग धोनी हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. धोनीने २००७ पासून २०१७ पर्यंत मर्यादित षटक आणि २००८ पासून २०१४ पर्यंत कसोटी क्रिकेट संघाचे नेतृत्व केले.
पूर्ण नाव | महेंद्रसिंग धोनी |
जन्म | 7 जुलै 1981, रांची |
पत्नीचे नाव | साक्षी धोनी |
वडीलांचे नाव | पान सिंह |
आईचे नाव | देवकी देवी |
राष्ट्रीयत्व | भारत |
विशेषता | उजव्या हाताने फलंदाज, उजव्या हाताने गोलंदाज |
क्रिकेट पदार्पण | 2 डिसेंबर 2005, श्रीलंका विरुद्ध |
खेळलेले सामने | कसोटी – 90, एकदिवसीय – 350, टी २० – 98 |
केलेल्या धावा | कसोटी – 4,876, एकदिवसीय – 10,773, टी २० – 1,617 |
शतके/अर्धशतके | कसोटी – 6/33, एकदिवसीय – 10/73, टी २० – 0/2 |
सर्वोच्च धावसंख्या | कसोटी – 224, एकदिवसीय – 183*, टी २० – 56 |
झेल / स्टंपिंग्ज | कसोटी – 256/38, एकदिवसीय – 321/123, टी २० – 57/34 |
परिचय
धोनीच्या कर्णधारपदाखाली २००७ आयसीसी विश्वचषक ट्वेंटी -२०, २०१० आणि २०१६ चा आशिया चषक, २०११ आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि २०१३ ची आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धा भारताने जिंकली.
उजव्या हाताने मध्यम क्रमात फलंदाजी करणारा आणि यष्टिरक्षण करणारा धोनी हा प्रभावी फिनिशर मानला जातो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० स्टंपिंग्ज मधून गडी बाद करणारा तो पहिला विकेटकीपर आहे.
वैयक्तिक जीवन
धोनीचा जन्म 7 जुलै १९८१ रोजी रांची, येथे झाला होता. धोनीचे वडील पानसिंग मेकॉनमध्ये कनिष्ठ व्यवस्थापनावर कार्यरत होते. धोनीला एक बहीण जयंती गुप्ता आणि भाऊ नरेंद्र सिंह धोनी आहेत. धोनीने झारखंडच्या डीएव्ही जवाहर विद्या मंदिर, रांची येथे आपले प्राथमिक शिक्षण घेतले. शाळेत असताना धोनीला फुटबॉल आणि बॅडमिंटन खेळण्याची खूप इच्छा होती. धोनी हा त्याच्या फुटबॉल संघाचा गोलकीपर होता. धोनी जरी क्रिकेट खेळत नसला तरी तो फुटबॉल येत असल्यामुळे विकेटकीपिंग चांगला करत होता. क्लब क्रिकेटमधील आपल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्याला १९९७-९८ च्या हंगामात अंडर १६ विनू मंकड ट्रॉफी चँपियनशिपसाठी निवडले गेले आणि त्याने चांगली कामगिरी केली.
धोनीने साक्षी सिंग रावत सोबत २०१० मध्ये लग्न केले. ती त्याच्या डीएव्ही जवाहर विद्या मंदिर शाळेत सोबत शिकत होती. लग्नाच्या वेळी साक्षी हॉटेल मॅनेजमेंट शिकत होती. २०१५ मध्ये त्यांना झीवा नावाची मुलगी झाली.
क्रिकेट कारकीर्द
व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळण्यास धोनीने १९९८ सालापासून सुरुवात केली.
बिहारमधून क्रिकेटची सुरुवात
१९९८ मध्ये धोनीची निवड सेंट्रल कोल फील्ड्स लिमिटेड (सीसीएल) संघाकडून खेळण्यासाठी झाली. जेव्हा त्याला लवकर खेळायची संधी मिळाली तेव्हा त्याने खूप चांगली फलंदाजी केली. त्याचे कोच देवल सहायने धोनीची फलंदाजी बघून धोनीची निवड बिहार संघात व्हावी यासाठी प्रयत्न केले. नंतर एका वर्षातच धोनी सीसीएलमध्ये खेळून बिहार रणजी संघात दाखल झाला.
बिहार क्रिकेट संघ
धोनीने १९९०-२००० साली रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात बिहार संघाकडून पदार्पण केले. त्याने पदार्पण सामन्यात आसाम क्रिकेट संघाविरूद्ध दुसर्या डावात खेळताना नाबाद ६८ धावा केल्या. धोनीने आपले पहिले प्रथम श्रेणी शतक बिहार विरुद्ध बंगालच्या सामन्यात केले. २००१/०२ च्या रणजी सिजनमध्ये त्याने चार रणजी सामन्यांत पाच अर्धशतके ठोकली होती.
झारखंड क्रिकेट संघ
२००२-०3 च्या मोसमात धोनीच्या कामगिरीमध्ये रणजी करंडकातील तीन अर्धशतके आणि देवधर करंडकातील दोन अर्धशतकांचा समावेश होता. २००३-०४ च्या च्या मोसमात धोनीने रणजी वनडे स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात आसामविरुद्ध १२८ धाव चोपल्या.
भारत अ संघ
२००३-०४ च्या हंगामात केलेल्या आपल्या चांगल्या फलंदाजीमुळे झिम्बाब्वे आणि केनिया दौर्यासाठी भारत अ संघात धोनीला निवडले गेले. केनिया, भारत अ आणि पाकिस्तान ए या त्रिकोणीय टूर्नामेंटमध्ये धोनीने भारताच्या अ संघाला पाकिस्तान २२3 धावांचे आव्हान पूर्ण करताना धोनीने अर्धशतक झळकावले. त्याने सलग २ सामन्यात २ शतके झळकावली.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
धोनीने भारत अ संघात स्थान मिळविल्यानंतर २००४-०५ मध्ये बांगलादेश दौर्यासाठी त्याला एकदिवसीय संघात निवडले गेले.
एकदिवसीय कारकीर्दीची सुरुवात
२००० च्या सुरुवातीच्या काळात भारतीय संघात राहुल द्रविडला एक चांगला यष्टिरक्षक आणि फलंदाज म्हणून पाहिले जात असे. आपल्या पदार्पण सामन्यात तो शून्यावर धावबाद झाला. त्याची सुरुवात काही चांगली झाली नाही.
मालिकेच्या दुसर्या सामन्यात धोनीने आपल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात विशाखापट्टणममध्ये केवळ १२३ चेंडूंत १४८ धावा केल्या. श्रीलंकेसोबत चालू असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात कुमार संगकाराच्या शतकानंतर श्रीलंकेने भारताला २९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि प्रत्युत्तरात भारताची सुरुवात खूप खराब झाली. भारताने सचिन तेंडुलकरची विकेट गमावली. धावांना वेग देण्यासाठी धोनीला वरच्या क्रमांकावर पाठवण्यात आले आणि त्याने १४५ चेंडूत नाबाद १८३ धावा करत भारताला विजय मिळवून दिला.
मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात धोनीने ४६ चेंडूंत ७२ धावा फटकावल्या. मालिकेच्या अंतिम सामन्यात पुन्हा धोनीने ५६ चेंडूंत ७७ धावा केल्यामुळे भारताने मालिका ३-१ अशी जिंकली.
२००७ विश्वचषक
२००७ च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेश आणि श्रीलंकेसोबत झालेल्या पराभवामुळे भारत अनपेक्षितपणे वर्ल्ड कपमधून बाहेर पडला. या दोन्ही सामन्यात धोनी शून्यावर बाद झाला आणि त्याने संपूर्ण स्पर्धेत फक्त २ धावा केल्या.
२००९ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेदरम्यान धोनीने दुसर्या वनडे सामन्यात अवघ्या १०७ चेंडूत १२४ धावा फटकावल्या आणि भारताला ६ विकेटने विजय मिळवून दिला. २००९ मध्ये धोनीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये केवळ २४ डावांमध्ये १११९ धावा केल्या.
२०११ विश्वचषक
आयसीसी क्रिकेट विश्वकरंडक २०११ मध्ये भारताला विजेता संघ म्हणून आधीपासून मानले जात होते. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघाना उपांत्यपूर्व फेरीत आणि उपांत्य फेरीत हरवून १९८३ नंतर दुसरा विश्वचषक जिंकण्यास मदत केली.
२०११ वर्ल्ड कप नंतर
२०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात पहिला आणि एकमेव कर्णधार बनला आहे ज्याने आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकल्या आहेत.
नोव्हेंबर २०१३ मध्ये सचिन तेंडुलकर नंतर धोनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध १००० किंवा त्याहून अधिक वन डे धावांचा विक्रम करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला.
२०१५ वर्ल्ड कप
२०१५ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान धोनीने गट टप्प्यातील सर्व सामने जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, युएई, वेस्ट इंडीज, आयर्लंड आणि झिम्बाब्वेविरुद्ध भारताने विजय मिळविला होता.
ईडन पार्क येथे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्याने २८८ धावांचा पाठलाग करताना नाबाद ८५ धावा केल्या आणि सुरेश रैनाबरोबर १९६ धावांची नाबाद भागीदारी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
जानेवारी २०१७ मध्ये धोनीने मर्यादित षटकांच्या स्वरूपात भारताचे कर्णधार पद सोडले. त्याच मालिकेच्या दुसर्या सामन्यात त्याने १२२ चेंडूंत १४४ धावा केल्या, त्यात युवराज सिंगसह चौथ्या विकेटसाठी २६६ धावांची भागीदारी केली होती.
ऑगस्ट २०१७ मध्ये त्या वर्षी, पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय दरम्यान श्रीलंकेविरुद्ध मध्ये कोलंबो येथे खेळताना त्याने आपला १०० वा यष्टिचित टिपला.
धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
कसोटी करिअर
आपल्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याच्या उत्तम कामगिरीनंतर धोनीने डिसेंबर २००५ मध्ये दिनेश कार्तिकच्या जागी भारतीय संघाचा कसोटी विकेटकीपर म्हणून स्थान मिळवले.
जानेवारी ते फेब्रुवारी २००६ मध्ये भारताने पाकिस्तान दौऱ्यावर फैसलाबाद येथे झालेल्या दुसर्या कसोटी सामन्यात पहिले शतक ठोकले. पुढील तीन सामन्यांत धोनीने काही फलंदाजी करत शतकी खेळी केली, त्यापैकी एक पाकिस्तानविरुद्ध भारत पराभूत झाला तर दोन इंग्लंडविरुद्ध भारताला १-० अशी आघाडी मिळाली होती.
२००६ मध्ये वेस्ट इंडीज दौर्यावर धोनीने अँटिगा येथे पहिल्या कसोटीत जलद ६९ धावा केल्या. त्याने उर्वरित ६ डावांमध्ये ९९ धावा केल्या आणि संपूर्ण मालिकेत १३ झेलबाद आणि 4 स्टंपिंग्ज करत गडी बाद केले.
२००९ मध्ये श्रीलंकेच्या भारत दौर्यामध्ये धोनीने दोन शतके ठोकली होती. तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने भारताला २-० ने विजय मिळवून दिला होता. या पराक्रमासह, भारत इतिहासात प्रथमच कसोटी क्रिकेटमधील पहिल्या क्रमांकावर पोचला.
टी २० करिअर
धोनी हा भारताच्या पहिल्या ट्वेंटी -२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या टीममध्ये होता. त्याने डिसेंबर २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पदार्पण केले. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता.
१२ फेब्रुवारी २०१२ रोजी धोनीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना नाबाद ४४ धावा केल्या आणि भारताला पहिला विजय मिळवून दिला.
२००७ मध्ये पहिल्या ट्वेंटी -२० विश्वचषकामध्ये भारताचे नेतृत्व करण्यासाठी एमएस धोनीची निवड झाली होती.२ सप्टेंबर २००७ रोजी प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर विजय मिळवत धोनी सर्व प्रकारचे विश्वचषक जिंकणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला.
इंडियन प्रीमियर लीग
धोनीला चेन्नई सुपर किंग्जने ११ कोटी रुपयात खरेदी केले. यामुळे तो पहिल्या हंगामाच्या लिलावासाठी आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने २०१० आणि २०११ आणि २०१८ मधील इंडियन प्रीमियर लीग विजेतेपद आणि २०१० आणि २०१४ मध्ये चँपियन्स लीग टी -२० विजेतेपद जिंकले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
भारताच्या स्वातंत्र्याच्या दिवशी धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
धोनीने केलेले आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड
कसोटी क्रिकेट
- धोनीच्या नेतृत्वात, २००९ मध्ये भारताने प्रथमच कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थान गाठले.
- सौरव गांगुलीच्या नंतर धोनी हा २७ कसोटी विजयांसह सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे.
- धोनीने परदेशी जाऊन सर्वात जास्त विजय मिळवले आहेत
- धोनी ४००० कसोटी धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय विकेटकीपर आहे.
- धोनीचे पाकिस्तान विरुद्ध फैसलाबाद येथे पहिले शतक हे भारतीय विकेटकीपरने सर्वात वेगवान शतक आहे
- एका डावात ६ आणि एका सामन्यात ९ भारतीय विकेटकीपरने सर्वाधिक बाद केल्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे.
एकदिवसीय क्रिकेट
- धोनी एकूण १०० सामने जिंकणारा तिसरा कर्णधार आहे.
- धोनी हा सचिन तेंडुलकर , सौरव गांगुली आणि राहुल द्रविडनंतर दहा हजार एकदिवसीय धावा करणारा चौथा भारतीय आहे.
- 50 पेक्षा जास्त सरासरीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पार करणारा पहिला खेळाडू आहे
- सहाव्या स्थानावर फलंदाजी करताना एकदिवसीय इतिहासातील सर्वाधिक धावा धोनीच्या नावावर आहेत
- धोनी हा एकमेव खेळाडू आहे ज्याने 7 व्या क्रमांकावर फलंदाजी ला येऊन शतक केले आहे
- एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक नाबाद ८२ वेळा
- वनडेमध्ये २०० षटकार ठोकणारा पहिला भारतीय आणि पाचवा एकूण
- धोनी आणि भुवनेश्वर कुमार श्रीलंकेविरुद्ध नाबाद १०० धावांच्या भागीदारी केली होती. ही एकदिवसीय सामन्यात भारताची सर्वाधिक आठवी विकेटची भागीदारी आहे.
- कर्णधार म्हणून एकदिवसीय इतिहासातील सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम आहे ज्याने यष्टिरक्षक म्हणूनही कामगिरी बजावली आहे, २०० सामने
- एकदिवसीय कारकीर्दीत कोणत्याही विकेटकीपरने धोनीकडे सर्वाधिक स्टंपिंग्स १२० केले आहेत
टी २० क्रिकेट
- कर्णधार म्हणून टी २० मध्ये सर्वाधिक विजय, ४१
- टी २० मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने, ७२
- शून्यावर कधीच बाद न होणार खेळाडू, सलग टी २० सामने ८४
- टी 20 मध्ये सर्वाधिक विकेटकीपर म्हणून कॅच, ५४
- टी २० मध्ये विकेटकीपर म्हणून सर्वाधिक स्टंपिंग्ज, ३३
मिळालेले पुरस्कार
नागरी पुरस्कार
- २०१८ मध्ये पद्मभूषण , भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार
- २००९ मध्ये पद्मश्री, भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार
- २००७-०८ मध्ये राजीव गांधी खेल रत्न , भारतातील क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दलचा सर्वोच्च सन्मान
खेळातील पुरस्कार
- २००८, २००९ मध्ये आयसीसीचा एकदिवसीय प्लेअर ऑफ द इयर
- २००६, २००८, २००९, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४ मध्ये आयसीसी वर्ल्ड वन डे इलेव्हन
- २००९, २०१०, २०१३ मध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट इलेव्हन
- २०११ मध्ये कॅस्ट्रॉल ऑफ इंडियन क्रिकेटर ऑफ द इयर
- २०११-२०२० दशकातील आयसीसी पुरुषांचा एकदिवसीय संघात निवड (कर्णधार आणि यष्टीरक्षक)
- २०११-२०२० दशकातील आयसीसी पुरुषांचा टी -२० संघात निवड (कर्णधार आणि यष्टीरक्षक)
- २०११-२०२० दशकाचा आयसीसी स्पिरिट ऑफ थे क्रिकेट पुरस्कार
इतर सन्मान आणि पुरस्कार
- २००६ मध्ये एमटीव्ही युथ आयकॉन ऑफ द इयर
- २०१३ मध्ये एलजी पीपल्स चॉईस अवॉर्ड
- २०११ मध्ये डी माँटफोर्ट विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी
- २०११ मध्ये सीएनएन-न्यूज १८ कडून इंडियन ऑफ ऑफ द इयर पुरस्कार
तर हा होता महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावरील माहिती मराठी भाषेत लेख. मला आशा आहे की आपणास महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावरील हा माहिती लेख (Mahendra Singh Dhoni information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.