मी पाहिलेला चित्रपट मराठी निबंध, Mi Pahilela Chitrapat Marathi Nibandh

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी पाहिलेला चित्रपट मराठी निबंध (mi pahilela chitrapat Marathi nibandh). मी पाहिलेला चित्रपट या विषयावर लिहलेला हा मराठी निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी मी पाहिलेला चित्रपट मराठी निबंध (mi pahilela chitrapat Marathi nibandh) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

मी पाहिलेला चित्रपट मराठी निबंध, Mi Pahilela Chitrapat Marathi Nibandh

मागच्या एक वर्षपासून मी माझ्या वडिलांना मला चित्रपट दाखवायला घेऊन जाण्याचा हट्ट करत होतो. आम्हाला १५ ऑगस्ट ला सुट्टी होती आणि वडिलांना सुद्धा नेमकीच सुट्टी होती.

परिचय

आम्ही सर्वांनी चित्रपट बघायला जाण्याचे ठरवले. १५ ऑगस्ट असल्यामुळे सर्व देशभक्ती वर आधारित चित्रपट लावले गेले होते. आम्ही ऑपेरा थिएटरला भेट दिली जिथे शहीद भगत सिंग, बॉर्डर, माँ तुझे सलाम हे चित्रपट दाखवले जात होते.

चित्रपट पाहण्याचा संयोग

चित्रपटगृहाच्या बाहेर भिंतीवर चिकटवलेली पोस्टर्स पाहताच मला शहीद भगत सिंग हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा लागली. पोस्टर्समध्ये भगतसिंग अनेक चित्रात, कधी तुरुंगात तर कधी आनंदाने फाशी घेताना दिसत होते.

Mi Pahilela Chitrapat Marathi Nibandh

मी वडिलांना बोललो कि आपण शहीद भगत सिंग हा चित्रपट बघू. मी तिकीट खरेदी केले आणि सिनेमागृहात प्रवेश केला. संपूर्ण हॉल हा आधीच भरून गेला होता. खूप लहान मुले हा चित्रपट बघायला आली होती. आम्ही प्रवेश केला तेव्हा नुकताच चित्रपट सुरु होणार होता. लवकरच चित्रपट सुरू झाला.

शहीद भगत सिंग चित्रपट कसा होता

शहीद भगत सिंग या चित्रपटात अजय देवगण याने महत्वाची भूमिका केली होती. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा चित्रपट जीवंत, प्रेरणादायी आणि विचार करायला लावणारा होता. भारताचे महान शहीद भगतसिंग यांना त्यांच्या अत्यंत उत्साही, इंग्रजांना चिरी मुंड्या चिट करत आणि धाडसी भूमिका साकारताना दाखवण्यात आले. त्यांनी ब्रिटिश सरकारच्या जुलूम आणि क्रूरतेचा कसा सामना केला, ही दाखवले गेले. त्यांच्या देशभक्तीने ब्रिटिशांच्या सर्व क्रूरता आणि अत्याचारांचा सामना केला.

चित्रपटात, भगतसिंग हे एक कट्टर देशभक्त आणि क्रांतिकारक म्हणून दाखवण्यात आले आहे ज्यांच्यासाठी मातृभूमीचे स्वातंत्र्य हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. ब्रिटिश राजवटीतील क्रूरता भगतसिंग आणि त्याचे मित्र राजगुरू आणि सुखदेव यांनी सहन केली. तुरुंगात असताना, त्यांना आपला देश स्वतंत्र करण्यासाठी सर्व त्रास आणि यातना सहन करण्याचा निर्धार असलेला एक स्वतंत्र आणि निर्भय क्रांतिकारी म्हणून दाखवण्यात आले.

शेवटी, सुखदेव आणि राजगुरूसह भगतसिंगला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. भारताच्या तिन्ही वीर पुत्रांना फाशी देण्यात आली. हे हृदयस्पर्शी दृश्य होते आणि पाहताना सर्व बघणारे लोक विशेषतः लहान मुलांच्या डोळ्यात पाणी आले होते. यांनतर हा चित्रपट संपला. चित्रपट संपला तरी मला चित्रपट आठवून अंगावर काटे येत होते.

भारताच्या या महान देशभक्तांनी संयम आणि उत्कटतेने, धैर्याने आणि दृढनिश्चयाने कशी हसत हसत फाशी घेत आपले बलिदान दिले हे अवर्णनीय आहे.

निष्कर्ष

भगतसिंगांची भूमिका अद्वितीय आहे. भगतसिंगांचे धैर्य आणि दृढनिश्चय आणि त्यांचे शौर्य येणाऱ्या पिढ्यांसाठी सर्वात प्रेरणादायी आहे. हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्याचा संघर्ष आणि ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भगतसिंग यांनी घेतलेली भूमिका दर्शवतो.

मला शहीद भगत सिंग हा चित्रपट खूप आवडला. चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याचा अनुभव हा माझ्यासाठी खूप वेगळा होता. आणि माझा पहिलाच चित्रपट मी शहीद भगत सिंग हा चित्रपट पाहून तो आनंद द्विगुणित केला असे मला वाटते.

तर हा होता मी पाहिलेला चित्रपट मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास मी पाहिलेला चित्रपट हा निबंध माहिती लेख (mi pahilela chitrapat Marathi nibandh) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

1 thought on “मी पाहिलेला चित्रपट मराठी निबंध, Mi Pahilela Chitrapat Marathi Nibandh”

Leave a Comment