Pink WhatsApp Installation Virus – सावधान! पिंक व्हाट्सएप इन्स्टॉलेशन लिंक तुमचा स्मार्टफोन हॅक करू शकतो, जाणून घ्या काय करावे?
दैनंदिन जीवनामध्ये आजकाल जर कोणाला व्हॉट्सअॅप बद्दल माहिती नाही असा कोणी भेटणे अवघडच आहे. साधारणपणे २०१० साली आपल्या देशात व्हाट्सएप ने सुविधा देण्यास सुरुवात केली आणि लवकरच देशातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग माध्यम बनले.
व्हाट्सएपचे जसे अनेक फायदे आहेत जसे कि, नवीन ग्रुप बनवून त्यावर सर्वांशी जोडलेले असणे, व्हॉइस कॉल्स, विडिओ कॉल्स, आता नवीन चालू केलेली पेमेंट्स सुविधा आणि बरेच काही. जसे फायदे तसेच तोटे पण आहेत, सध्याच्या युगात कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत अफवा पसरवणे याच्यासाठी सुद्धा व्हाट्सएपचाच उपयोग केला जात आहे.
साधारणपणे लोकांना येणारे खोटे मेसेज
- अमुक तमुक कंपनी १००० रुपये चा फुकट मोबाईल रिचार्ज मारून देत आहे
- मुकेश अंबानी जियोचे १ करोड ग्राहक झाले म्हणून ६ महिने इंटरनेट डेटा पॅक फ्री देत आहे
- फ्लिपकार्ट वर या सेल मध्ये मोबाईल फक्त ९९ रुपयात मिळेल, असे खूप काही
सध्या एक नवीनच मेसेज व्हॉट्सअॅप फिरत आहे तो म्हणजे:
लिंक वर क्लीक करा आणि व्हॉट्सअॅपची थीम गुलाबी करा
यात एक लिंक दिली आहे आणि तिचा उपयोग करून व्हॉट्सअॅप एकदा अपडेट करून घ्या, त्याच्या नंतर तुमच्या व्हॉट्सअॅपची थीम गुलाबी किंवा हिरव्या रंगाची होईल.
ऑनलाईन रिपोर्टनुसार हा मेसेज व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी नवीन फीचरचे आश्वासन देखील देतो.
व्हॉट्सअॅप यूजर्सला मिळालेला मेसेज अधिकृत आहे आणि स्वतः फेसबुकने त्याची खात्री केली आहे असे सुद्धा सांगण्यात आले आहे.
स्वतः व्हॉट्सअॅपची टीम नक्की काय सांगते
व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना गुगल प्ले स्टोअर किंवा अँपल स्टोअरवर उपलब्ध असलेल्या व्हॉट्सअॅपशिवाय अन्य कोणत्याही प्रकारची एपीके फाईल किंवा मोबाइल अॅप तुमच्या मोबाइलमध्ये कधीही इन्स्टॉल करू नका.
अशा कोणत्याही अॅप्सचा उपयोग वापरकर्त्याच्या स्मार्टफोनमध्ये तडजोड करण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण डेटा चोरण्यासाठी केला जाऊ शकतो. याचा उपयोग तुमच्या बँकिंग खात्याशी संबंधित माहिती चोरी करण्यासाठी केला जाऊ शकतो.
तर तुम्हाला असा मेसेज मिळाल्यास आपण काय करावे
जर आपल्याला असा मेसेज तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून मिळाला आहे, एखाद्या ग्रुप वर आला आहे, तर याची सर्व माहिती त्यांना द्या, तसेच त्यांना हा मेसेज डिलिट करण्यास सांगून दुसऱ्या कोणाला सुद्धा पाठवू नये असे सांगावे.
गुगल प्ले स्टोअर किंवा अँपल स्टोअरवर उपलब्ध नसलेल्या कोणत्याही दुसऱ्या अॅप कोणासोबत शेअर करू नका आणि तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नका. अशा अॅप तुमचा मोबाइल फोन हॅक करू शकतात
अशा अफवा पसरवू नका आणि पसरू देऊ नका
खूप छान माहिती