नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे स्वार्थी मित्र आणि अस्वल मराठी गोष्ट (swarthi mitra story in Marathi). स्वार्थी मित्र आणि अस्वल मराठी गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी स्वार्थी मित्र आणि अस्वल मराठी गोष्ट (swarthi mitra story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.
स्वार्थी मित्र आणि अस्वल मराठी गोष्ट, Swarthi Mitra Story in Marathi
मुलांना कथा ऐकायला आवडतात. लहान वयात आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक आपल्याला असच गोष्टींमधून समजतो. अशा नैतिक कथा मुलांमध्ये नीतिमत्तेची भावना विकसित करण्यास मदत करतात आणि त्यांना एक चांगला विद्यार्थी, देशाचा नागरिक होण्यास मदत करतात.
परिचय
लहानपणी आपल्याला आईवडील ज्या प्रेरणादायी, बोध घेणाऱ्या गोष्टी सांगतात त्याच गोष्टींचे प्रतिबिंब आपल्या मनावर उमटत असते. अशाच काही चांगल्या गोष्टी आम्ही घेऊन आलो आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या जीवनात फायदा होईल.
स्वार्थी मित्र आणि अस्वल मराठी गोष्ट
रामपूर नावाच्या गावात दोन मित्र राहत होते त्यांचे नाव रमेश आणि सुरेश. एके दिवशी दुपारी बाहेर फिरायला जाण्याचे ठरवले. त्याच्या गावाच्या जवळच एक जंगल होते. जंगलात मोठे धबधबे, फळे फुले खूप काही बघायला होते. त्यांनी जंगलातच जाण्याचे ठरवले
फिरण्यासाठी शेजारच्या जंगलात ते दुपारी बाहेर पडले. जंगलात जाताना त्यांनी एकमेकांना आधीच वचन दिले होते कि जर चुकून काही संकट आले तर एकमेकांचे रक्षण करायचे.
ते जंगलाच्या मध्यभागी पोहचताच त्यांना कुजबुज ऐकू आली. ते दोघे सुद्धा घाबरले. मागे वळून त्यांनी पाहिजे तर त्यांना एक भलेमोठे अस्वल त्यांच्या कडे येत असताना दिसले.
रमेश हा गावालाच राहत असल्यामुळे त्याला झाडावर चढता येत होते. स्वताचा जीव वाचवण्यासाठी पटकन रमेश शेजारच्या झाडावर चढला,
पण सुरेश हा मुंबई ला राहणार मुलगा होता आणि त्याला झाडावर चढता येत नव्हते. अस्वल जवळ येत आहे हे बघून सुरेश घाबरून गेला. अचानक त्याला एक युक्ती सुचली. त्याने बेशुद्ध होण्याचे सोंग केले आणि जमिनीवर पडून राहिला.
थोड्या वेळाने अस्वल सुरेशच्या जवळ आहे, त्याने सुरेशच्या अंगाचं वास घेतला पण त्याला सुरेश मेळा आहे असे वाटले.
अस्वलाने सुरेशच्या शरीराच्या सर्व बाजूंनी निरखून पहिले आणि निघून गेले. अस्वल दार जाताच रमेश झाडावरून खाली उतरला आणि सुरेश जवळ गेला.
रमेश हसत हसत सुरेशला म्हणाला, काय रे अस्वल तुझ्या कानात काय सांगत होते. हे बोलणे ऐकताच सुरेशने लगेच त्याला उत्तर दिले कि अस्वलाने मला सल्ला दिला की स्वार्थी आणि संकटात मदत न करणाऱ्या मित्रापासून दूर राहा. जे मित्र तुला संकटकाळी मदत करत नाहीत ते कधीच खरे मित्र नसतात.
हे ऐकून रमेशला आपली चूक समजली.
तात्पर्य
संकटात उपयोगी पडतो तोच खरा मित्र.
तर हि होती स्वार्थी मित्र आणि अस्वल मराठी गोष्ट. मला आशा आहे की स्वार्थी मित्र आणि अस्वल मराठी गोष्ट (swarthi mitra story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.