शाळेतील प्रवेश रद्द करण्याचा अर्ज कसा लिहावा, School Admission Cancel Application in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे शाळेतील प्रवेश रद्द करण्याचा अर्ज कसा लिहावा (school admission cancel application in Marathi) माहिती लेख. शाळेतील प्रवेश रद्द करण्याचा अर्ज हा मराठी माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही शाळेतील प्रवेश रद्द करण्याचा अर्ज कसा लिहावा (school admission cancel application in Marathi) हा लेख वाचून तसा अर्ज लिहून तुमच्या शाळेत देऊ शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये अर्ज उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

शाळेतील प्रवेश रद्द करण्याचा अर्ज कसा लिहावा, School Admission Cancel Application in Marathi

कधीकधी तुम्हाला घेतलेले शाळेतील ऍडमिशन करावे लागते. त्याची काही सुद्धा करणे असू शकतात.

परिचय

कोणत्याही कारणास्तव जर तुम्हाला तुमची शाळा किंवा महाविद्यालयातील प्रवेश रद्द करायचा असेल तर तुम्हाला मुख्याध्यापकांना विनंती पत्र लिहून प्रवेश रद्द करण्याची आणि तुम्ही भरलेली फी परत करण्याची विनंती करणे आवश्यक आहे.

शाळेतील प्रवेश रद्द करण्याची कारणे

एक विद्यार्थी म्हणून, तुम्ही खालील कारणांसाठी प्रवेश रद्द करण्याची विनंती करू शकता:

  • आर्थिक अडचण आली असेल तर
  • दुसऱ्या शाळेत किंवा दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तर
  • दुसऱ्या कॉलेजमध्ये चांगल्या कोर्ससाठी ऍडमिशन मिळाले असेल तर
  • इतर कोणतेही वैयक्तिक कारण असेल

शाळा-महाविद्यालयांचे प्रवेश रद्द करताना त्यांच्या अटी व शर्ती अगोदर वाचायला हव्यात. जेणेकरून भविष्यात प्रवेश रद्द करताना कोणतीही अडचण येणार नाही.

शाळेतील प्रवेश रद्द करण्याचा अर्ज नमुना १

प्रति,
मुख्याध्यापक,
प्राथमिक शाळा, पुणे.

विषय: शाळेतील प्रवेश रद्द करण्यासाठी अर्ज

आदरणीय सर,

मी विनम्र विनंती करतो की, माझी सरकारी हायस्कूल, नाशिक येथे गुणवत्तेवर निवड झाल्यामुळे मला आता नाशिक येथे जावे लागणार आहे. मी आधीच तुमच्या शाळेत आधीच ऍडमिशन घेतले आहे. त्यामुळे तुमच्या शाळेतील माझा प्रवेश रद्द करण्यात यावा हि नम्र विनंती.

मी एका माध्यम वर्गीय कुटुंबातील आहे आणि ही प्रवेश फी माझ्या भावी शिक्षणासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणूनच मला माझी भरलेली रक्कम परत मिळेल अशी आशा करतो.

मी तुमचा आभारी राहीन.

माझ्या प्रवेशाची माहिती खालीलप्रमाणे आहे:

नाव: सागर पाटील
ऍडमिशन क्रमांक: १०८७३
प्रवेश घेतलेला वर्ग: ७ वी अ
संपर्क क्रमांक: XXXXXXXXXX

तुमचा आज्ञाधारक
सागर पाटील

Admission Cancel Application in Marathi

शाळेतील प्रवेश रद्द करण्याचा अर्ज नमुना २

प्रति,
मुख्याध्यापक,
प्राथमिक शाळा, पुणे.

विषय: शाळेतील प्रवेश रद्द करण्यासाठी अर्ज

आदरणीय सर,

आदरपूर्वक मला असे सांगावे वाटते कि माझ्या मुलासाठी मी तुमच्या शाळेत ऍडमिशन घेतले होते, परंतु माझी बदली आता राहस्थान येथे झाली आहे. मी आता माझ्या कुटुंबासहित राजस्थानला स्थलांतरित होत आहे.

तुमच्या शाळेत मला ऍडमिशन मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजत होतो. परंतु दुर्दैवाने आता माझी बदली होत असल्याने माझा प्रवेश रद्द करण्यासाठी आणि जमा केलेल्या फीचा परतावा देण्यासाठी मी तुम्हाला विनंती करत आहे.

मी तुमचा खूप आभारी राहीन.

माझा प्रवेश तपशील:

नाव: सागर पाटील
ऍडमिशन क्रमांक: १०८७३
प्रवेश घेतलेला वर्ग: ७ वी अ
संपर्क क्रमांक: XXXXXXXXXX

विनम्र
प्रताप पाटील

शाळेतील प्रवेश रद्द करण्याचा अर्ज नमुना ३

प्रति,
मुख्याध्यापक,
प्राथमिक शाळा, पुणे.

विषय: शाळेतील प्रवेश रद्द करण्यासाठी अर्ज

आदरणीय सर,

सर मला तुम्हाला सांगावेसे वाटते कि मी तुमच्या महाविद्यालयात अकरावी सायन्स मध्ये प्रवेश घेतला आहे. तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना मी इतर संस्थांमध्येही माझे प्रवेश अर्ज जमा केले.

सुदैवाने मला एका सरकारी महाविद्यालयात शिष्यवृत्तीच्या आधारे प्रवेश मिळाला, जिथे मला कोणतीही फी किंवा निधी भरावा लागत नाही. मी एक गरीब विद्यार्थी आहे आणि मला तुमच्या कॉलेजची फी परवडत नाही.

मला विनंती करायची आहे की तुम्ही कृपया माझे ऍडमिशन रद्द करा आणि माझी फी परत करा. मी तुमचा अत्यंत ऋणी राहीन.

माझा प्रवेश तपशील:

नाव: सागर पाटील
ऍडमिशन क्रमांक: १०८७३
प्रवेश घेतलेला वर्ग: अकरावी सायन्स
संपर्क क्रमांक: XXXXXXXXXX

विनम्र
सागर पाटील

शाळेतील प्रवेश रद्द करण्याचा अर्ज नमुना ४

प्रति,
मुख्याध्यापक,
प्राथमिक शाळा, पुणे.

विषय: शाळेतील प्रवेश रद्द करण्यासाठी अर्ज

आदरणीय सर,

मी, सागर पाटील तुमच्या शाखेत अकरावी सायन्स मध्ये प्रवेश घेतला आहे. काही वैयक्तिक कारणांसाठी मला हा प्रवेश रद्द करावा लागत आहे. माझा प्रवेश रद्द करण्यासाठी आणि शुल्क परत करण्यासाठी मी हा अर्ज देत आहे.

माझा प्रवेश तपशील:

नाव: सागर पाटील
ऍडमिशन क्रमांक: १०८७३
प्रवेश घेतलेला वर्ग: अकरावी सायन्स
संपर्क क्रमांक: XXXXXXXXXX

मी तुम्हाला विनंती करतो की कृपया माझा प्रवेश रद्द करा आणि नियमांनुसार माझ्याद्वारे भरलेल्या शुल्काचा परतावा द्या.

विनम्र
सागर पाटील

निष्कर्ष

तर हा होता शाळेतील प्रवेश रद्द करण्याचा अर्ज कसा लिहावा माहिती लेख. मला आशा आहे की आपणास शाळेतील प्रवेश रद्द करण्याचा अर्ज हा मराठी माहिती लेख (school admission cancel application in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment