Corona Vaccine Registration: कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार; कशी कराल नोंदणी?

Corona Vaccine Registration – १८ ते ४४ वर्षांमधील लोकांना कोरोना लसीकरण करण्यासाठी आजपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. सरकारने आधीच सांगितले आहे कि कोणालाही ऑनलाईन रजिस्ट्रेशन न करता लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करण्याची सुविधा मिळणार नाही. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अ‍ॅपचा वापर करु शकता.

Corona Vaccine Registration

कोरोना लसीकरण परिस्थिती

१६ जानेवारीपासून आपल्या देशात कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली होती. आतापर्यंत एकूण १४.७७ कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी २४ लाखांहून अधिक लोकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण १४ कोटी ७७ लाख २७ हजार लसीचे डोस देण्यात आले असून शक्य तितक्या लवकर सर्वांना लस मिळावी यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.

दरम्यान, १ मे २०२१ पासून देशातील १८ वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती लस घेऊ शकते, अशी घोषणा नुकतीच केंद्रातील मोदी सरकारने केली आहे. देशात करोनाचे रुग्ण वाढत असताना तिसरी लाट येण्याचा धोका सांगितला आहे. अशा परिस्थितीत लसीकरण अनिवार्य असल्याचे सरकारने सांगितले आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आजपर्यंत महाराष्ट्राने दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. याबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन करत रोज ८ लाख लसीकरणाचे राज्याने उद्दिष्ट ठेवले असून त्याचा लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याचे सांगितले.

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी लसीकरण मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्यात १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना लसीकरण ऑनलाईन रजिस्ट्रेशन

देशभरात १ मे पासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. यापूर्वी ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली होती. १८ ते ४४ वर्षांमधील लोकांना कोरोना लसीकरण करण्यासाठी आजपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. सरकारने आधीच सांगितले आहे कि कोणालाही ऑनलाईन रजिस्ट्रेशन न करता लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करण्याची सुविधा मिळणार नाही. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अ‍ॅपचा वापर करु शकता.

कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे कराल

१. कोरोना लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अ‍ॅप वर रजिस्ट्रेशन करु शकतात.

२. सर्वात आधी तुम्हाला www.cowin.gov.in वर जावे लागेल. या वेबसाइट वर रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल. Register/ Sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा. तुम्ही टाकलेल्या मोबाइल नंबरवर एक OTP येईल. तोच OTP टाकून तुम्ही तुमचे अकाउंट व्हेरिफाय करून घ्या.

३. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला Registration of Vaccination वर जायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला फोटो आयडी जसे कि आधार कार्ड, मतदान कार्ड आणि त्याचा नंबर, नाव, जन्म दिनांक, आणि अन्य माहिती भरावी लागणार आहे. यानंतर रजिस्टर बटनवर क्लिक करावे. तुम्हाला SMS द्वारे सर्व आवश्यक माहिती पाठवली जातील. या ठिकाणी तुम्हाला Beneficiary Reference ID दिला जाईल.

४. आपल्या जवळच्या कोरोना लसीकरण सेंटरला शोधण्यासाठी तुम्हाला www.cowin.gov.in वर जाऊन खाली बाजूस जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जवळचे कोरोना लसीकरण सेंटर, त्याचा पत्ता भेटेल.

५. तुम्हाला लस कधी घायची आहे ते कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला अकाउंट डिटेल पेजवर जावे लागेल. यानंतर कॅलेंडर आयकॉन वर जाऊन तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे वॅक्सिनेशन सेंटर निवडू शकता.

६. तुम्ही कोरोना वॅक्सिनेशन सेंटर निवडले कि तुम्हाला कोणता दिवस, वेळ निवडायची आहे याचा पर्यात दिसेल. यानुसार, स्लॉट निवडा. यानंतर बुक बटनवर क्लिक करा. यानंतर Appointment Confirmation पेज दिसेल . सर्व माहिती परत एकदा चेक करून कन्फर्म बटनवर क्लिक करा. आणि तुम्ही ठरवून दिलेल्या वेळेला लस घ्या.

७. आपण कोविड १९ लस घेतली आहे याचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला cowin.gov.in वर जावे लागेल. तसेच तुम्ही आरोग्य सेतू अ‍ॅपचा सुद्धा वापर करू शकता. आरोग्य सेतू अ‍ॅपवर गेल्यानंतर कोविन च्या पर्यायावर जावे लागेल. यानंतर Vaccination Certificate पर्यायावर जावे लागेल. यानंतर Beneficiary Reference ID टाकला कि Get Certificate बटनवर क्लिक करावे लागेल. या सर्टिफेकट मध्ये तुमचे नाव, जन्म दिनांक, तुमचा Beneficiary Reference ID, फोटो ओळखपत्र, घेतलेल्या लसीचे नाव, हॉस्पिटलचे नाव हि सर्व माहिती दिसेल.

८. CoWin वेबसाइट वरून सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला https://selfregistration.cowin.gov.in/vaccination-certificate या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर Beneficiary Reference ID टाकून तुम्ही तुमचे सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता.

Leave a Comment