Free Covid Vaccination in Maharashtra – कोरोनाची दुसरी लाटेने संपूर्ण भारतभर रौद्र रूप धारण केले असताना आज सलग चौथ्या दिवशी कोरोनाव्हायरसच्या तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद केली गेली. महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त रुग्ण नोंद असलेले राज्य असून राज्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोनाव्हायरसच्या ६०,००० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे.
केंद्र सरकारचे आवाहन
कोविडच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी या आठवड्याच्या सुरूवातीस कोरोनाव्हायरसविरूद्धच्या लढाईत लसीकरण हेच सर्वात मोठे शस्त्र असल्याचे प्रतिपादन केले आणि अधिकाधिक रुग्णांना लसीकरण कसे देता येईल याची अंमलबजावणी करण्याचे डॉक्टरांना आवर्जून सांगितले. १ मे पासून १८ वर्षे वयोगटातील सर्व लोकांसाठी कोरोना लसीकरण झुले करण्यात आल्याचे सरकारने आधीच सांगितले आहे.
केंद्राच्या घोषणेनंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या लसीची किंमत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी रुग्णालये यांनी वेगळी वेगळी असेल असे ठरवले आहे. या वेगळ्या स्तरावरून आधीच राज्य सरकार आणि केंद्र सरकार असे शीतयुद्ध पेटलेले असताना केंद्र सरकारने स्पष्ट केले की केंद्र सरकारने घेतलेल्या लस राज्यांना मोफत देण्यात येतील.
कोविड प्रकरणात महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व वाढ दिसून येत आहे. बेड आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्राला वेठीस धरले आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी पूर्वी असे म्हटले होते की कोव्हीडची अजून तिसरी लाट लवकरच येईल, परंतु ती कशी असेल याचा अंदाज आता बांधता येणार नाही म्हनुनच लसीकरण हाच एक चांगला उपाय आहे असे ते म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे यांची घोषणा
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी लसीकरण मोहिमेच्या तिसर्या टप्प्यात १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. १८ ते ४५ वर्षांतील नागरिकांना लसीकरणासाठी स्वतः खर्च करावा लागणार होता. गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही या विषयावर चर्चा केली १८ ते ४५ वयोगटातील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्य सरकार मोफत लस देईल असा निर्णय घेण्यात आला असे ठाकरे म्हणाले.
यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाशी चर्चा चर्चा करून लसीकरणासाठी निविदा काढल्या जातील असे कॅबिनेट मंत्री श्री. नवाब मलिक यांनी रविवारी सांगितले. मलिक म्हणाले की, महागाईच्या विरोधात लढा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार खंबीर असून शक्य तितक्या लवकर सर्वांना लस मिळावी हाच आमचा मुख्य उद्देश आहे.
कोणकोणत्या राज्यात मोफत लस मिळणार आहे
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, केरळ, छत्तीसगड, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, आसाम, सिक्कीम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि हरियाणा या राज्यातील सर्वच नागरिकांना मोफत लस देण्याचे आश्वासन दिले आहे.