दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ मराठी गोष्ट, Doghanche Bhandan Tisryacha Labh Story in Marathi

नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहेत सगळे. आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ मराठी गोष्ट (doghanche bhandan tisryacha labh story in Marathi). दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ मराठी गोष्ट लहान मुलांसाठी आणि पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळेत किंवा तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी लबाड लांडगा आणि बगळा मराठी गोष्ट (doghanche bhandan tisryacha labh story in Marathi) सांगू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मराठीमध्ये उपलब्ध आहे, त्या गोष्टीसुद्धा आपण आपण वाचू शकता.

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ मराठी गोष्ट, Doghanche Bhandan Tisryacha Labh Story in Marathi

मुलांना कथा ऐकायला आवडतात. लहान वयात आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक आपल्याला असच गोष्टींमधून समजतो. अशा नैतिक कथा मुलांमध्ये नीतिमत्तेची भावना विकसित करण्यास मदत करतात आणि त्यांना एक चांगला विद्यार्थी, देशाचा नागरिक होण्यास मदत करतात.

परिचय

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी त्याला चांगले आई वडील, मित्र, पुस्तके यांची सोबत असेल आवश्यक आहे. लहानपणी आपल्याला आईवडील ज्या प्रेरणादायी, बोध घेणाऱ्या गोष्टी सांगतात त्याच गोष्टींचे प्रतिबिंब आपल्या मनावर उमटत असते. अशाच काही चांगल्या गोष्टी आम्ही घेऊन आलो आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या जीवनात फायदा होईल.

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ मराठी गोष्ट

एकदा एक सिंह आणि अस्वल आपल्या भक्ष्याच्या शोधात जंगलात फिरत होते. दोघेही भुकेने व्याकूळ झाले होते. अचानक त्यांना हरीण दिसले. दोघांनी हल्ला करून त्या हरणाला ठार केले. पण हरीण एवढे लहान होते की त्या दोघांनाही पुरेसं अन्न नव्हतं.

Doghanche Bhandan Tisryacha Labh Story in Marathi

मग सिंह आणि अस्वल एकमेकांशी भांडू लागले. दोघांचा राग एवढा वाढला की ते एकमेकांवर कुरघोडी करू लागले. दोघांनाही शिकार एकट्याने खायची होती. त्यांनी वाटणी मान्य नव्हती.

या भांडणात ते जबर जखमी झाले. अस्वल इतका गंभीर जखमी झाला होता की त्याच्यात आता उठण्याची ताकद नव्हती.

तेवढ्यात एक हुशार कोल्हा तिथून चालला होता. त्यांनी दोघेही जखमी अवस्थेत पडलेले पाहिले. त्यांच्यामध्ये मृत हरणाला पाहून कोल्ह्याला सर्व काही समजले.

कोल्ह्याने हरणाला तोंडात पकडले आणि ओढून झुडपांच्या मागे नेले.

सिंह आणि अस्वलाची अशी दयनीय अवस्था झाली होती की त्यांना त्यांचे हात पाय हलवताही येत नव्हते. दोघेही असहाय्यपणे कोल्ह्याला आपली शिकार घेऊन जाताना पाहत होते.

नंतर सिंह म्हणाला एवढ्या छोट्या गोष्टीवर भांडण करणे हा आपला मूर्खपणा होता. आपण हुशार असतो तर आपण वाटणी केली असती. पण आपल्या लोभामुळेच आपण आज एका कोल्ह्याने आपली शिकार ओढून नेण्याच्या स्थितीत पोहोचलो आहोत.

हे ऐकून अस्वलानेही होकार दिला आणि म्हणाला हो मित्रा, तू बरोबर बोलत आहेस.

तात्पर्य

तिसरी व्यक्ती नेहमी दोघांच्या भांडणाचा फायदा घेते.

तर हि होती दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ मराठी गोष्ट. मला आशा आहे की दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ मराठी गोष्ट (doghanche bhandan tisryacha labh story in Marathi) आवडली असेल. जर आपल्याला हि गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment