भारतीय शेतीवर मराठी निबंध, Essay On Agriculture in India in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे भारतीय शेतीवर मराठी निबंध (essay on agriculture in India in marathi). भारतीय शेतीवर लिहिलेला हा निबंध मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी भारतीय शेतीवर मराठी माहिती निबंध (Agriculture information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर विषयांवर सुद्धा मराठीमध्ये निबंध आहेत, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

भारतीय शेतीवर मराठी निबंध, Essay On Agriculture in India in Marathi

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपल्या देशात लोक शेती हे हजारो वर्षांपासून करत आहेत. आधुनिक काळानुसार शेती विकसित होत गेली आहे आणि नवीन तंत्र, उपकरणांच्या वापराने जवळपास सर्व पारंपारिक शेतीच्या पद्धती बदलल्या आहेत.

परिचय

भारतातील शेती ही बहुसंख्य लोकसंख्येचे जीवनमान आहे आणि आपण शेतीला कधीच कमी लेखू शकत नाही. दूध, मसाले, डाळी, चहा, काजू यांसारख्या पिकांच्या उत्पादनात भारत हा अव्वल देश आहे आणि तांदूळ, गहू, तेलबिया, फळे आणि भाज्या, ऊस आणि कापूस यात भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश आहे.

Essay on Agriculture in India in Marathi

भारतात अजूनसुद्धा काही लहान शेतकरी अद्याप जुन्या पारंपारिक शेतीच्या पद्धती वापरतात, कारण त्यांच्याकडे आधुनिक प्रकारे शेती करण्यासाठी संसाधने नाहीत, आर्थिक अडचण आहे. शेती व्यवसायाने आपल्या देशाच्या विकासासाठी तसेच इतर क्षेत्रामध्ये सुद्धा मदत केली आहे.

भारतीय कृषी क्षेत्राचा विकास

भारत शेतीवर खूप अवलंबून आहे. आपल्या देशात शेती ही रोजीरोटीचे साधन नसून आपले जीवन जगण्याचे साधन आहे. तसेच, संपूर्ण देश अन्नासाठी शेतीवर अवलंबून असल्याने सरकार या शेती आणि शेतकरी लोकांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.

हजारो वर्षांपासून आपल्या पूर्वजांपासून आपण शेती करत आहोत, परंतु अजून सुद्धा शेती पूर्णपणे विकसित झाली नाही. अजून सुद्धा लोक पारंपरिक पद्धतीने शेती करतात. स्वातंत्र्यानंतर भारत देशाची अन्नाची मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला देशांकडून धान्य आयात करावे लागत असे. पण, हरित क्रांतीनंतर आपल्या देशातील शेतकरी आपल्या देशाला लागेल त्यापेक्षा जास्त धान्य पिकवत आहे. आत्ता आपण अतिरिक्त देशांत अन्नधान्य निर्यात करण्यास सुद्धा सुरवात केली.

जवळपास २०-३० वर्षांपूर्वी पिकाच्या लागवडीसाठी जवळजवळ संपूर्ण पावसाळ्यावर अवलंबून राहावे लागत असे, परंतु आता आपण धरणे, कालवे, नळ विहिरी आणि पंप-संच तयार केले आहेत. याशिवाय आपल्याकडे आता चांगली खते, कीटकनाशके आणि बियाणे आहेत ज्यांच्या मदतीने आपण पूर्वीच्यापेक्षा अधिक धान्य पिकवू शकतो.

तसेच, आपले कृषी क्षेत्र बर्‍याच देशांच्या तुलनेत बळकट झाले आहे आणि आपण संपूर्ण जगात सर्वात जास्त धान्य पिकवणारे आणि निर्यात करणारे देशांमध्ये आपले नाव आहे.

स्वातंत्र्यानंतर भारतीय शेतीचा इतिहास

स्वातंत्र्यानंतर भारतीयांनी अन्न सुरक्षा कार्यक्रमात बरीच प्रगती केली. स्वातंत्र्यानंतर भारतीय लोकसंख्या खूप वेगाने वाढली आणि आपण आपले अन्न धान्य उत्पादन सुद्धा वाढवले आहे. १९६० च्या आधी आपल्याला पूर्णपणे अन्नधान्य आयातीवर अवलंबून राहावे लागत होते.

परंतु याला निमित्त ठरले ते १९६५ आणि १९६६ चा भीषण दुष्काळ. या भीषण दुष्काळानंतर भारतात हरित क्रांतीची सुरुवात झाली. हरित क्रांतीची सुरुवात करण्याचा मूळ हेतू हा आपल्या कृषी धोरणात सुधारणा करण्याचा होता. हरित क्रांतीमुळे पंजाब हे राज्य संपूर्ण देशाला अन्नपुरवठा करणारे राज्य बनले. पंजाबनंतर उत्तर प्रदेश, हरियाणा सारख्या राज्यांमध्ये उत्पादनात वाढ दिसून आली. हरित क्रांती हा कार्यक्रम राज्यातील सिंचनाच्या क्षेत्रावर केंद्रित होता. यामध्ये सरकारी अधिकारी आणि शेतकरी यांनी एकत्र काम केले. उत्पादकता आणि शेतीमधून अधिक अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल याच्यावर लक्ष केंद्रित केले.

हरित क्रांती कार्यक्रमामुळे उत्पादन वाढते, ज्यामुळे भारत स्वावलंबी होईल याची खात्री झाली. २००० पर्यंत भारतीय शेतकर्‍यांनी प्रति हेक्टरी सहा टन पर्यंत गव्हाचे उत्पादन येणारे वाण स्वीकारले. संपूर्ण देशात धरणे बांधली गेली आणि ती सिंचन प्रकल्पांच्या विकासासाठी वापरली गेली. त्यामुळे स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा स्रोत देखील उपलब्ध झाला आहे आणि शेतीला सुद्धा पाणी मिळाले.

भारतातील शेतीचे महत्त्व

असे म्हणणे अयोग्य नाही की आपण जे रोज अन्न खातो हे शेती आणि शेतकऱ्याची कृपा आहे आणि भारतीय शेती व्ययसायाने आपल्याला रोजचे जेवण दिले आहे.

देशाच्या जीडीपी उत्पादनात आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शेतीसाठी मोठ्या संख्येने कामगार लागतात. साधारणपणे ८०% लोक हे शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत. ज्या वस्तू आपला देश निर्यात करतो त्यात ७०% वस्तू या शेतीमधून उत्पादीत केलेल्या आहेत. चहा, कापूस, वस्त्रोद्योग, तंबाखू, साखर, मसाले, तांदूळ आणि इतर बऱ्याच वस्तू आहेत.

शेतीचा हवामानावर होणारे परिणाम

हवामान बदल आणि हरितगृह वायू उत्सर्जन

बर्‍याच नैसर्गिक आणि मानवनिर्मित प्रणाली जागतिक उर्जा संतुलन आणि पृथ्वीच्या वातावरणामधील बदलांवर परिणाम करतात. मानवनिर्मित ग्रीनहाऊस मधून बार पडणारा वायू हा सुद्धा यातीलच एक घटक आहे. ग्रीनहाऊस वायू आपल्या बाहेरच्या तापमानातील उष्णता शोषून घेतात व कमी वातावरणात पिकांची वाढ होणेस मदत करतात. हि अशी पिके असतात ज्यांना बाहेर असलेले तापमान सहन होत नाही.

जंगलतोड

शेतीमुळे जंगलतोड सुद्धा होत आहे. जंगलतोड म्हणजे शेतीसाठी, इतर कामासाठी झाडे तोडून जागा मोकळी करणे. हि झाडे जंगलातुन कायमस्वरुपी काढून टाकली जातात. शेतीसाठी जमीन साफ ​​करणे किंवा जनावरांना चाऱ्यासाठी, इंधन आणि बांधकामासाठी लागणारे लाकूड अशी अनेक करणे आहेत.

हायब्रीड पिके, रसायने आणि कीटकनाशके

हायब्रीड तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारित पिकांच्या संकल्पनेने कृषी जगताला बरेच फायदे दिले आहेत. रोग आणि कीटकांपासून प्रतिरोधक पिके करून, रोग आणि कीटकांचा बचाव करण्यासाठी लोक जास्त प्रमाणात रासायनिक कीटकनाशके वापरात आहेत ज्याच्या मुळे सुद्धा पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.

प्रदूषण

प्रदूषणामुळे पर्यावरणावर प्रतिकूल जैविक परिणाम होऊ शकतात. आपल्या देशात पिके कापल्यानंतर काही शेतकरी आपली राहिलेले गवत, कचरा जाळतात. ज्यामुळे वायू प्रदूषण होते.

जमिनीची धूप

जमिनीची धूप झाल्यास सुपीक जमिनीची पीक घेण्याची क्षमता कमी होते. जमिनीच्या धूप होण्याने नद्यांमध्ये व नाल्यांमध्ये प्रदूषण व गाळाचे प्रमाण वाढते आणि मग मासे तसेच इतर प्रजातींचे जनजीवन धोक्यात येते. गाळामुळे देखील बर्‍याचदा पाणी साचू शकते आणि त्यामुळे पूर येऊ शकतो.

शेतीमुळे होणारा कचरा

शेतीमुळे होणारा कचरा हा प्रामुख्याने शेतीशी संबंधित वस्तू, कामांमुळे तयार होतो. यात शेतात झालेली घाण, कोंबड्यांची घरे आणि कत्तलखान्यांमधील कंपोस्ट आणि इतर कचरा समाविष्ट आहे. पीक कचरा, आपण वापरत असलेली कीटकनाशके समाविष्ट आहेत.

निष्कर्ष

स्थानिक पायाभूत सुविधा, स्थानिक संसाधने, मातीची गुणवत्ता आणि तिकडे असलेले हवामान यामुळे प्रत्येक राज्यात कृषी उत्पादन भिन्न असते. सिंचन पायाभूत सुविधा, कोल्ड स्टोरेज, फूड पॅकेजिंग इत्यादी क्षेत्र जर सुधारले तर भारतीय शेतकर्‍यांची उत्पादकता वाढविण्याला अजून बराच वाव आहे, जेणेकरून स्थानिक शेतकरी त्यांचे उत्पादन आणि उत्पन्न सुधारू शकतील.

कमी कालावधीत उच्च उत्पादन आणि कमी खर्च आणि उत्पन्नासह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने अनेक सुधारणांची घोषणा केली आहे. अलीकडेच सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. ऑनलाईन बाजारात आपला शेतीमाल विकणे हा सुद्धा एक नवीन मार्ग आहे ज्याच्या मदतीने शेतकरी आपला महसूल वाढविण्याचा आणि त्यांच्या उत्पादनाच्या विस्तृत बाजारपेठासाठी प्रयत्न करीत आहेत.तर हा होता भारतीय शेतीवर मराठी निबंध, मला आशा आहे की आपणास भारतीय शेतीवर मराठी निबंध (essay on agriculture in India in marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment