गौतम गंभीर माहिती मराठी, Gautam Gambhir Information in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे गौतम गंभीर यांच्याबद्दल माहिती मराठी भाषेत (Gautam Gambhir information in Marathi). गौतम गंभीर यांच्या जीवनावरील हा माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी गौतम गंभीर यांच्यावर मराठीत माहिती (Gautam Gambhir biography in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या खेळामध्ये असलेल्या प्रसिद्ध खेळाडूंची माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे, ते लेखसुद्धा आपण आपण वाचू शकता.

गौतम गंभीर माहिती मराठी, Gautam Gambhir Information in Marathi

गौतम गंभीर हा एक लोकप्रिय माजी क्रिकेटपटू आहे, त्याने भारतीय संघाकडून सर्व प्रकारच्या खेळात सहभाग घेतला आहे. खेळातून निवृत्त झाल्यांनतर त्याने भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवून खासदारकी मिळवली आहे. २०१९ पासून दिल्ली येथून लोकसभेचे विद्यमान सदस्य आहेत.

[table id=13 /]

परिचय

गौतम गंभीर हा एक डावखुरा सलामीवीर फलंदाज होता जो दिल्लीसाठी डोमेस्टिक क्रिकेट खेळला. इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सचे नेतृत्व केले. २००७ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकात त्याने ५४ चेंडूत ७५ धावा करत आणि २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात अंतिम फेरीत १२२ चेंडूत ९७ धावा करत आपल्या भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने २०१२ मध्ये आपले पहिले आयपीएल विजेतेपद मिळवले होते आणि पुन्हा २०१४ मध्ये सुद्धा विजेतेपद जिंकले होते.

वैयक्तिक जीवन

गौतम गंभीरचा जन्म १४ ऑक्टोबर १९८१ रोजी नवी दिल्ली येथे झाला. त्याचे वडील दीपक गंभीर कपड्यांचा व्यवसाय करत होते आणि आई सीमा गंभीर या गृहिणी होत्या. गंभीरला त्याच्या आजी आजोबांनी त्याच्या जन्माच्या अठरा दिवसांनी दत्तक घेतले होते आणि तेव्हापासून गंभीर हा त्यांच्यासोबतच राहिला.

Gautam Gambhir Information in Marathi

गंभीरने वयाच्या दहाव्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्याने आपले शालेय शिक्षण मॉर्डन स्कूल, नवी दिल्ली येथून केले आणि दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. गंभीरने आपले प्रशिक्षण दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री अकादमीचे संजय भारद्वाज आणि राजू टंडन यांच्याकडे केले.

ऑक्टोबर २०११ मध्ये गंभीरने नताशा जैनशी लग्न केले. नताशा जैन हि दिल्लीतील एका प्रमुख व्यावसायिक कुटुंबातील आहे.

डोमेस्टिक करिअर

गंभीरने आपल्या डोमेस्टिक करिअरची सुरुवात २००८ मध्ये केली. २००८ मध्ये रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने नाबाद १३० धावा करत उत्तर प्रदेशला नऊ गडी राखून पराभूत केले.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

गंभीरने २००३ मध्ये टीव्हीएस चषकात बांगलादेशविरूद्ध खेळताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने तिसऱ्या सामन्यात ७१ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

त्याने आपले एकदिवसीय करिअर मधील पहिले शतक २००५ मध्ये श्रीलंकेविरूद्ध केले. २००४ मध्ये त्याने गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळात आपले कसोटी करिअर मध्ये पदार्पण केले. परंतु, त्याला फक्त ३ आणि १ धावा करता आल्या.

२००७ च्या आयसीसी वर्ल्ड ट्वेंटी-२० साठी भारताच्या संघात गंभीरची निवड करण्यात आली. गंभीरने अंतिम सामन्यात ५४ चेंडूत महत्त्वपूर्ण ७५ धावा केल्या. २००७ च्या टी -२० विश्वचषक स्पर्धेमध्ये त्याच्या कामगिरीसाठी त्याला क्रिकेइन्फोने वर्ल्ड टी २० इलेव्हनमध्ये नाव दिले होते.

करिअर मधील महत्वाचे टप्पे

२००८ मध्ये गंभीरने चांगली कामगिरी करता भारतीय कसोटी संघात आपले स्थान पक्के केले. वीरेंद्र सेहवाग याच्यासह फलंदाजीची सुरूवात करताना त्याने सुरुवातिच्या ७ सामन्यात तब्बल ८५८ धावा फटकावल्या होत्या.

डिसेंबर २००८ मध्ये इंग्लंड आणि २००९ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता. आपल्या या केलेल्या कामगिरीबद्दल त्याला क्रिकेइन्फोने २००८ मध्ये वर्ल्ड टेस्ट इलेव्हन आणि वनडे इलेव्हनमध्ये स्थान दिले होते.

२००९ मध्ये न्यूझीलंड दौर्‍यावर दुसर्‍या कसोटी सामन्यात सामना वाचवणारी १३७ धावांची खेळी करत एका बाजूने झुंज दिली. या खेळीत त्याने तब्बल ४३० चेंडूंचा सामना केला. त्यानंतर तिसऱ्या कसोटीत दुसर्‍या डावात त्याने १६७ धावांची खेळी करुन भारताला अतुलनीय आघाडी मिळवून दिली. तीन कसोटीमध्ये गंभीरने सहा डावांमध्ये ४४५ धावा फटकावून ४१ वर्षानंतर भारताला न्यूझीलंड विरुद्ध १-० असा विजय मिळवून दिला.

२००९ मध्ये त्याने श्रीलंकेविरूद्ध आपल्या घरच्या मैदानावर आपला चांगला खेळ दाखवणे सुरूच ठेवले. पहिल्या कसोटी सामन्यात दुसर्‍या डावात त्याने शतक झळकावत पहिल्या डावात ३०० हून अधिक धावांची आघाडी घेतली. कानपूरमधील कसोटी सामन्यात त्याने स्वत: १६७ धावा केल्या आणि भारताला ६४२ धावांची आघाडी मुळवून देऊन विजय निश्चित केला.

२०१० मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत गंभीरला कर्णधार म्हणून निवडले गेले. वडोदरा येथे झालेल्या तिसर्‍या सामन्यात त्याने नाबाद १२६ धावा केल्या आणि मालिका विजयी केली. या मालिकेत झालेल्या ५ सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ५-० असा पराभव केला.

२०११ च्या मध्ये क्रिकेट विश्वकरंडक अंतिम सामन्यात वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर गंभीरने १२२ चेंडूत ९७ धावा केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला. गंभीरने आधी कोहलीशी चांगली भागीदारी केली आणि त्यानंतर एमएस धोनीसह १०९ धावांची भागीदारी करत भारताला सामना जिंकून दिला.

१२ फेब्रुवारी २०१२ रोजी, ऍडलेड ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात खेळताना गंभीरने १११ चेंडूत ९२ धावा करत पहिला सामना जिंकण्यासाठी भारताला मदत केली. भारतीय संघाचा हा सर्वात मोठा पाठलाग करतानाचा विजय होता.

इंडियन प्रीमियर लीग करिअर

इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रासाठी २००८ मध्ये गंभीरला दिल्ली डेअरडेव्हिल्स फ्रँचायझीने खरेदी केले. तो पहिल्या सत्रात १४ सामन्यांत ५३४ धावा करत त्या वर्षी सर्वात जास्त धावा करणारा दुसरा फलंदाज होता.

आयपीएल २०१० साठी त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले. त्या वर्षी स्पर्धेच्या शेवटी तो आयपीएलमध्ये १००० हून अधिक धावा करणारा दिल्ली डेअरडेव्हिल्सचा एकमेव खेळाडू ठरला.

२०११ मध्ये गंभीरला कोलकाता नाइट रायडर्स संघाने विकत घेतले. त्यानंतर त्याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. २०११ मध्ये गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल प्ले ऑफसाठी पात्रता मिळविली आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी -२० मध्ये पहिल्यांदाच स्थान मिळवले. २०१२ मध्ये त्यांनी चेन्नई सुपर किंग्ज संघाला हरवत पहिल्यांदाच आयपीएल चषकावर नाव कोरले. गंभीर हा कोलकाता नाईट रायडर्सचा सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू ठरला.

२०१४ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबला हरवून कोलकाता नाईट रायडर्सने आपले दुसरे विजेतेपद मिळवले. २०१६ आणि २०१७ साली त्याने कोलकाता नाईट रायडर्सला अंतिम प्लेऑफमध्ये नेले आणि त्या वर्षीसुद्धा आपल्या संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

सेवानिवृत्ती

गौतम गंभीर याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून ३ डिसेंबर २०१८ रोजी आपली निवृत्ती जाहीर केली.

राजकारण

२२ मार्च २०१९ रोजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत गौतम गंभीर भारतीय जनता पक्षात दाखल झाला. गौतम गंभीर यांनी १ जून २०१९ रोजी लोकसभेच्या खासदारपदाची शपथ घेऊन आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली.

केलेले रेकॉर्डस्

  • २००९ मध्ये त्याला सर्वाधिक धावांचा विक्रम
  • जानेवारी २००८ ते डिसेंबर २०१२ मध्ये सर्वाधिक वनडे धावा करणारा भारतीय फलंदाज
  • सलग ५ शतके करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू
  • सलग कसोटी सामन्यांमध्ये ११ अर्धशतकांचा विक्रम करणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे
  • सलग ५ कसोटी शतके करणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे

मिळालेले सन्मान

  • २००९ मध्ये आयसीसी टेस्ट प्लेअर ऑफ द पुरस्काराने सन्मानित
  • २००९ मध्ये गौतम गंभीरला अर्जुन पुरस्काराने सन्मानित
  • २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

तर हा होता गौतम गंभीर यांच्या जीवनावरील माहिती मराठी भाषेत लेख. मला आशा आहे की आपणास गौतम गंभीर यांच्या जीवनावरील हा माहिती लेख (Gautam Gambhir information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment