केदार जाधव माहिती मराठी, Kedar Jadhav Information in Marathi, Essay On Sports in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे केदार जाधव यांच्याबद्दल माहिती मराठी भाषेत (Kedar Jadhav information in Marathi). केदार जाधव यांच्या जीवनावरील हा माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी केदार जाधव यांच्यावर मराठीत माहिती (Kedar Jadhav biography in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या खेळामध्ये असलेल्या प्रसिद्ध खेळाडूंची माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे, ते लेखसुद्धा आपण आपण वाचू शकता.

केदार जाधव माहिती मराठी, Kedar Jadhav Information in Marathi

केदार जाधव हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे.

परिचय

केदार जाधव हा महाराष्ट्र आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो. तो एक फलंदाज अष्टपैलू आहे जो उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि उजव्या हाताने ऑफ-ब्रेकमध्ये गोलंदाजी करतो.

Kedar Jadhav Information in Marathi

केदार जाधवने नोव्हेंबर २०१६ मध्ये श्रीलंकेविरूद्ध भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले. १ जुलै २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना त्याने भारताकडून टी-२० मध्ये पदार्पण केले.

वैयक्तिक जीवन

केदार जाधव याचा जन्म २६ मार्च १९८५ रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडिलांचे नाव महादेव आणि आईचे नाव मंदाकिनी जाधव होते. त्यांचे मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील जाधववाडी हे आहे. केदार जाधव यांचे वडील १९८० मध्ये पुण्यात स्थलांतरित झाले होते. केदारचे वडील हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात लिपिक होते जे २००३ मध्ये सेवानिवृत्त झाले.

केदार चार मुलांपैकी सर्वात लहान होता. त्याला ३ मोठ्या बहिणी आहेत. तो अभ्यासात जास्त हुशार नव्हता पण त्याच्या तीन मोठ्या बहिणी अभ्यासामध्ये उत्तम होत्या, त्यामुले त्याने नववीतुन शाळा सोडत पूर्ण वेळ क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला.

केदार जाधव ने स्नेहल या माजी क्रिकेटपटूशी लग्न केले आहे. २००४ साली त्याने लग्न केले. स्नेहल हि स्वतः उजव्या हाताची फलंदाज आहे आणि महाराष्ट्र संघासाठी खेळते. तिने ३७ लिस्ट ए, एक प्रथम श्रेणी आणि ३१ ट्वेंटी-२० सामने सुद्धा खेळले आहेत. त्यांना मीराया जाधव नावाची एक मुलगी सुद्धा आहे.

डोमेस्टिक कारकीर्द

केदारने २००७ साली आपले डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मधल्या फळीतील फलंदाज म्हणून केदार जाधव खेळात राहिला.

२०१२ मध्ये, केदार जाधव याने आपले पहिले तिहेरी शतक केले. केदारने उत्तर प्रदेश विरुद्ध खेळताना ३२७ धावा केल्या होत्या. केदारने २०१३-१४ च्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या हंगामात १२३३ धाव केल्या. त्यात त्याची सहा शतके सुद्धा होती. केदार जाधवच्या या खेळीमुळे १९९२/९३ नंतर महाराष्ट्राला पहिली रणजी करंडक स्पर्धा जिंकता आली होती. केदार जाधवने भारत अ आणि वेस्ट झोन क्रिकेट संघाचेही प्रतिनिधित्व केले.

केदार जाधवने महाराष्ट्रासाठी ७४ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ४९४५ धावा केल्या आहेत. यात १३ शतके आणि ९ अर्धशतके आहेत.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

एकदिवसीय कारकीर्द

२०१२-१३ आणि २०१३-१४ च्या हंगामात केलेल्या आपल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला संघात घेण्यात आले. २०१४ मध्ये बांग्लादेश दौऱ्यासाठी त्याला राष्ट्रीय संघाच्या संघात स्थान देण्यात आले होते पण तो त्याला अंतिम ११ मध्ये स्थान देण्यात आले नाही. श्रीलंकेच्या भारत दौऱ्याच्या पाचव्या वनडेमध्ये त्याने पदार्पण केले. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात तो फक्त २० धावा केल्यावर बाद झाला.

२०१५ मध्ये झालेल्या झिम्बाब्वे संघाविरुद्ध तो तिन्ही सामने खेळला. त्याने तिसऱ्या सामन्यात ८७ चेंडूत १०४ नाबाद धावा करत संघाला विजय मिळवून दिला. जानेवारी २०१७ मध्ये केदारने ७६ चेंडूत १२० धावा करत कर्णधार विराट कोहलीसोबत २०० धावांची भागीदारी केली. तिसऱ्या सामन्यात त्याने ९० धावा करत भारताला जवळ जवळ जाणून दिले होते. त्या मालिकेत त्याने २३२ धावा करत सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला होता.

या मालिकेनंतर केदार जाधव भारतीय संघाचा मधल्या फळीतील महत्वाचा फलंदाज बनला. २०१७ मध्ये २३५ धावा केल्यावर आयसीसीने त्याला सामनावीर म्हणून सन्मानित केले.

२०१८ मध्ये त्याला त्याच्या दुखापतींमुळे हे वर्ष खूप कठीण गेले. त्यानंतर त्याने भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

टी-२० कारकीर्द

केदार जाधवने झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना टी-२० मध्ये पदार्पण केले. त्याने पदार्पण सामन्यात फक्त 9 धावा केल्या. केदार जाधवने एकूण ९ टी -२० सामने खेळले आहेत, जिथे त्याने १२२ धावा केल्या आहेत.

इंडियन प्रीमियर लीग कारकीर्द

केदार जाधवने २०१० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मधून इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात केली. त्यानंतरच्या हंगामात, त्याने कोची टस्कर्स केरळ संघाकडून आपला खेळ दाखवला. तथापि, त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याला फक्त ६ सामने खेळता आले.

त्याचा आयपीएल २०१७ चा सीजन हा आतापर्यंतचा सर्वोत्तम हंगाम होता. त्याने त्या वर्षी २६७ धावा केल्या. पुढील हंगामात त्याला चेन्नई सुपर किंग्सने त्याला खरेदी केले. त्याने अनेक सामन्यात चांगली फलंदाजी करत कधी कधी गोलंदाजी सुद्धा केली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये, आयपीएलच्या लिलावात सनरायझर्स हैदराबादकडून जाधवला खरेदी केले गेले.

तर हा होता केदार जाधव यांच्या जीवनावरील माहिती मराठी भाषेत लेख. मला आशा आहे की आपणास केदार जाधव यांच्या जीवनावरील हा माहिती लेख (Kedar Jadhav information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment