मी पाहिलेला महापूर मराठी निबंध, Mi Pahilela Mahapur Marathi Nibandh

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी पाहिलेला महापूर मराठी निबंध (mi pahilela mahapur Marathi nibandh). मी पाहिलेला महापूर मराठी निबंध हा मराठी माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी मी पाहिलेला महापूर मराठी निबंध (mi pahilela mahapur Marathi nibandh) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

मी पाहिलेला महापूर मराठी निबंध, Mi Pahilela Mahapur Marathi Nibandh

नद्या आणि त्यापासून मिळणारे पाणी हे मानवी संस्कृतीचा महत्वाचा भाग आहेत. नद्या मानवी जीवनासाठी मूलभूत गरज असलेले पाणी देतात. आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही आणि पिण्याच्या पाण्यासाठी नद्या हे सर्वात मोठे जलस्रोत आहेत.

परिचय

आपण इतिहासात सुद्धा पहिले आहे कि आपल्या पूर्वजांचा जन्म सुद्धा नदीच्याच किनारी झाला आहे. किंबहुना, भूतकाळातील आणि सध्याच्या सर्व संस्कृतींचा जन्म नदीच्या काठावर झाला होता. जरी नदी आपले जीवन असेल तरी कधीकधी नदी आपले रौद्र रूप सुद्धा दाखवते. हे रुद्र रूप म्हणजेच नदीला आलेला पूर.

पूर ही एका सर्वात धोकादायक नैसर्गिक आपत्तींपैकी एक आहे. पूर म्हणजे जेव्हा कधी नदीचे पाणी आपल्या पात्रातून बाहेर येऊन आजूबाजूच्या परिसरात पसरते तेव्हा त्याला पूर म्हणतात. आपल्या देशाला सुद्धा पुराचा धोका जास्त आहे. आपल्या देशातील नद्या या दुथडी भरून वाहत असल्याने पुराचा सामना अनेक राज्यांना करावा लागतो. नदीच्या प्रवाहाच्या परिसरात अतिक्रमण करणे, धरण फुटणे, थंड प्रदेशात असलेला बर्फ उन्हाळ्यात वितळणे यामुळे नदीला शल्यते पूर येतो.

मी पाहिलेला महापूर

पावसाळ्याचे दिवस होते, खूप पाऊस असल्यामुळे आम्हाला शाळेला सुट्टी होती. मी महाराष्ट्रातील कोयनानगर येथे राहणारा आहे. आमच्याकडे दरवर्षी खूप पाऊस पडतो. पावसाळ्यात कोयना नदी पूर्ण भरून वाहते. कधी कधी इतका पूर येतो कि आजूबाजूची शेती सुद्धा सुद्धा नाहीशी होते.

Mi Pahilela Mahapur Marathi Nibandh

या वर्षीची गोष्ट आहे, गुरुवार होता आणि तो दिवस बेंदुरचा सण होता, सर्व लोकांनी या दिवशी शेतातील कामाला सुटी घेतली होती. बुधवार रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला होता आणि पाऊस काही कमी व्हायचे नाव घेत नव्हता. बुधवार रात्र गेली, गुरुवार दुपार झाली आणि पावसाचा जोर आणखीनच वाढला.

महापुरात पडलेला पाऊस

सतत छत्तीस तास पाऊस पडत होता आणि आता धोक्याची चाहूल लागायला सुरुवात झाली होती. आम्ही सर्व गावच्या नदीकिनारी असणाऱ्या पुलाच्या जवळ जाऊन पुराचा अंदाज लावत होतो. पुराचे पाणी पाहता वडीलधारे लोक सांगत होते कि एवढे पाणी आम्ही आता पर्यंत कधीच पहिले नव्हते. पुलाच्या आजु बाजूला असलेली भातशेती पूर्णपणे वाहून गेली होती. आम्ही तब्बल २ तास पाऊस पाहून घरी जायचे ठरवले. पाऊस संध्याकाळ झाली तरी कमी झाला नव्हता.

महापुरात झालेले नुकसान

दुपारपासून वीज नसल्यामुळे सर्व लोक गावातील पारावर बसून होते. रात्री ९ वाजता पाऊस थांबला. सर्व गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन पुराची पाहणी करण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी झाली. पावसामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली होती. खालच्या वाडीत मी लोकांच्या रडण्याचा आवाज ऐकला. एका ग्रामस्थांचे घर पूर्णपणे बघून गेले होते आणि त्याची आई त्या ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे मरण पावली होती.

मी लोकांचे रडणे ऐकत असताना, एक शेतकरी आला आणि त्याने आपला पूल सुद्धा वाहून गेल्याचे सांगितले. आम्ही नदीच्या किनारी गेलो तर पूल हा पूर्णपणे वाहून गेला होता. सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते. नदीच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतात पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आणि वाहून गेली होती. आमच्या शेतात असणारे भाताचे पीक पूर्णपणे वाहून गेले होते.

मागच्या वाडीत पुराचे पाणी घरांमध्ये शिरले होते. मी घरच्या वरून पाहिले की गावातील लोकांची अवस्था दयनीय आहे. अनेक घरे कोसळली होती. मातीच्या बनलेल्या भिंती पाण्याच्या शक्तिशाली प्रवाहांमुळे वाहून गेल्या. संपूर्ण गाव पाण्याने इतके भरले होते की जणू ते समुद्रातील एक बेट आहे. सर्वत्र पाणी आणि पाणी होते.

पुरामुळे गावातील मालमत्तेचे आणि पशुजीवनाचे मोठे नुकसान झाले. अनेक घरे कोसळली आणि झोपड्या पाण्याखाली गेल्या. पूरग्रस्तांच्या बचावासाठी तालुक्यामधून काही लोक आले होते. त्यांनी जेवणाचे साहित्य, कपडे आणि पाण्याचे वाटप केले होते. या पुरामुळे लोकांचे खूप नुकसान झाले. लाखो रुपयांचे जीवित व मालमत्तेचे नुकसान झाले.

काही जुन्या गावातील लोकांनी सांगितले की आतापर्यंतचा सर्वात मोठा पूर आहे. एवढे मोठे मालमत्तेचे नुकसान, जनावरांचे नुकसान याआधी कधीही झाले नव्हते. पुराचे नंतरचे काही परिणाम अधिक हानिकारक होते. गावात पुरामुळे अनेक रोग पसरले. पुराची आठवण काढली कि माझ्या अंगावर आजही काटा येतो.

निष्कर्ष

शेवटी असू म्हणू शकतो कि आपण नैसर्गिक रित्या पावसाने पूर येत असेल तर थांबवू शकत नाही पण काहीवेळा पुराची करणे मानवनिर्मित सुद्धा आहेत. बंधारे तुटणे, खराब ड्रेनेज सिस्टम, आणि बरेच काही यासारखी मानवनिर्मित कारणे आपण थांबवू शकतो.

तर हा होता मी पाहिलेला महापूर मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास मी पाहिलेला महापूर मराठी निबंध हा लेख (mi pahilela mahapur Marathi nibandh) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment