रांगणागड किल्ला माहिती मराठी, Rangnagad Fort Information in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे रांगणागड किल्ला मराठी माहिती निबंध (Rangnagad fort information in Marathi). रांगणागड किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी रांगणागड किल्ला मराठी माहिती निबंध (Rangnagad fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

रांगणागड किल्ला माहिती मराठी, Rangnagad Fort Information in Marathi

सिंधुदुर्गातील कुडाळ शहर जिल्ह्यातील रांगणागड किल्ला पर्यटकांसाठी खूप प्रसिद्ध आहे. कुडाळ एमएसआरटीसी बस स्टँडपासून रांगणागड किल्ला हा २० किमी अंतरावर आहे.

परिचय

रांगणागड हा किल्ला समुद्रसपाटीपासून २६०० फूट उंचीवर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्वेला असलेला हा किल्ला कोल्हापूर-सिंधुदुर्गच्या सीमेवर स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी बांधला गेला होता.

Rangnagad Fort Information in Marathi

रांगणागडाच्या आजूबाजूला हळदीचे नेरुर, चाफेली, केरवडे, निळेली, गिरगाव, कुसगाव ही गावे आहेत. रांगणागडाच्या माथ्यावरून वेंगुर्ले येथील दीपगृह, सावंतवाडी, कुडाळदरम्यानच्या मुंबई-गोवा महामार्ग हा सर्व भाग दिसतो.

रांगणागड किल्ल्याचा इतिहास

शिलाहार भोजांच्या काळात बांधलेल्या पंधरा किल्ल्यांपैकी हा किल्ला आहे. शिलाहार वंशीय राजा महामंडलेश्वर भोज (दुसरा) याने इ.स.११८७ च्या सुमारास रांगणागडाचे बांधकाम केले. समुद्रसपाटीपासून अंदाजे २६०० फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्याने राजा भोज, बहामणी राजा महंमद गवाण, आदिलशहा, शिवाजी महाराज अशा अनेक राजांची सत्ता पहिली आहे.

रांगणागड किल्ल्याची रचना

या गडाला यशवंत दरवाजा, गणेश दरवाजा, हनमंत दरवाजा, दिंडी दरवाजा, निंबाळकर दरवाजा असे मोठमोठे दरवाजे आहेत. रांगणागडाला दोन महत्वाचे बुरुज आहेत. हे दोन्ही बुरुज आता ढासळलेले आहेत.

गडाच्या यशवंत दरवाजापासून ते गणेश दरवाजापर्यंत दक्षिण उत्तर अशी एक मोठी आणि मजबूत तटबंदी बांधण्यात आली होती पण दरवर्षी पावसात दरडी कोसळल्यामुळे या तटबंदीचा बराचसा भाग आता नष्ट झाला आहे.

गडाच्या मध्यावर रांगणाईदेवीचे एक मंदिर आहे. या रांगणाई देवीवरूनच या गडाला रांगणागड हे नाव ठेवले असे बोलले जाते. या मंदिराच्या बाजूलाच एक हनुमानाचे देखील मंदिर आहे.

रांगणाई देवीच्या मंदिराव्यतिरिक्त या गडावर गणेश, जैन, वासुदेव, धाराबाई या मंदिराचे आता फक्त काही अवशेष उरले आहेत.

त्या काळात पाणीपुरवठय़ासाठी गडावर सुमारे ३५० पेक्षा जास्त विहिरी बांधण्यात आल्या होत्या असे थोर इतिहासकार सांगतात. यापैकी अनेक विहिरी या नष्ट झाल्या आहेत.

गडावर निवास करण्याची सोय

गडावर राहण्याची सोय नाही. तुम्हाला कुडाळमध्ये हॉटेल्स उपलब्ध आहेत तिथे राहावे लागेल.

रांगणागडावर कसे पोहचाल

हवाई मार्गे सर्वात जवळचे विमानतळ दाबोलिम आहे.

रेल्वेने कोकण रेल्वेवरील सर्वात जवळचे स्थानक कुडाळ रेल्वे स्थानक आहे.

रस्त्याने तुम्हाला मुंबईहून कुडाळला जाण्यासाठी नियमित बस सहज मिळू शकते. कुडाळपासून रांगणा किल्ला २० किमी अंतरावर आहे.

रांगणागड किल्ल्याच्या जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे

नारूर गावात महालक्ष्मी रांगणागडाच्या पायथ्याशी आहे. रांगणागडावर जाण्यापूर्वी पर्यटक देवीचा आशीर्वाद घेतात. टिपरी जत्रा हा मंदिराचा मुख्य वार्षिक कार्यक्रम आहे ज्यामध्ये भाविकांची मोठी गर्दी होते.

रांगणागडाच्या पायथ्याशी धबधब्याने तयार केलेल्या विहिरीसारखे आश्चर्यकारक विवर आहे जे फक्त पावसाळ्यात दिसते. ही विहीर पूर्वेकडून रांगणागडाच्या पायथ्याशी घनदाट खोऱ्यात लपलेली आहे.

रांगणागडाच्याच्या पूर्वेला असलेल्या खडकाळ डोंगरावरून आरोपींना खाली फेकून मारले जाई. याला कडेलोट पॉईंट असे म्हणतात.

निष्कर्ष

तर हा होता रांगणागड किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास रांगणागड किल्ला हा निबंध माहिती लेख (Rangnagad fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment