पगारवाढीचा अर्ज कसा लिहावा, Salary Increment Application in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पगारवाढीचा अर्ज कसा लिहावा (salary increment application in Marathi) माहिती लेख. पगारवाढीचा अर्ज कसा लिहावा हा मराठी माहिती लेख सर्व कर्मचारी लोकांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या नोकरीच्या, कामाच्या ठिकाणी तुमचा पगार वाढवण्याची विनंती करण्यासाठी पगारवाढीचा अर्ज कसा लिहावा (salary increment application in Marathi) हा लेख वाचून तसा अर्ज लिहून तुमच्या कामाच्या ठिकाणी देऊ शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये अर्ज उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

पगारवाढीचा अर्ज कसा लिहावा, Salary Increment Application in Marathi

पगार हा कंपनीकडून कर्मचाऱ्याला दर महिन्याला मिळणारी एक ठराविक रक्कम असते.

परिचय

व्यवसाय चालवण्याच्या दृष्टिकोनातून, पगार हे ऑपरेशन्स चालवण्यासाठी मानवी संसाधने मिळवणे आणि टिकवून ठेवण्याची किंमत म्हणून देखील पाहिले जाऊ शकते आणि नंतर त्याला कर्मचारी खर्च किंवा पगार खर्च म्हटले जाते.

आपल्या कामाच्या ठिकाणी अनेक वर्ष काम करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली जाते. तो त्याच्या कामाचा मोबदला सुद्धा असतो.

पगार वाढवण्याची कारणे

या महागाईच्या काळात जेवण, राहणीमान, मुलांचे शिक्षण आदींवर होणारा खर्च वाढत आहे. त्यामुळे कमी पगारात घर चालवणे हे आव्हानापेक्षा कमी नाही. अशा परिस्थितीत, बहुतेक लोकांना त्यांचे पगार वाढवायचे आहेत आणि त्यांना चांगले जीवन जगायचे आहे.

पगार वाढवण्याची योग्य प्रकारे मागणी कशी करावी

सामान्यतः लोक अशा परिस्थितीत बॉससमोर बोलण्यास संकोच करतात किंवा ते स्वतःला योग्यरित्या व्यक्त करू शकत नाहीत. तसे असल्यास, ईमेल किंवा पत्राद्वारे, तुम्ही तुमचा मुद्दा कंपनीच्या एचआर मॅनेजरसमोर योग्यरित्या मांडला पाहिजे. वेतनवाढीसाठी विचारण्याचा ईमेल हा सर्वोत्तम मार्ग आहे .

Salary Increment Application in Marathi

पगारवाढीचा अर्ज कसा लिहावा

तुमचा पगार वाढवण्याचा अर्ज करताना नम्र असणे आवश्यक आहे. पगार वाढवण्यासाठी एचआर मॅनेजरला पत्र लिहले जाते, ज्यामध्ये महागाई, तुमची उपलब्धी आणि पात्रता इत्यादी कारणांमुळे झालेली वाढ याबद्दल नीट माहिती देऊन आपण मागत असलेली पगारवाढ का योग्य आहे हे सांगून तुमचा पगार वाढवण्याची विनंती करावी.

महागाईमुळे पगार वाढीसाठी अर्ज

प्रति,
प्रताप पाटील,
एचआर मॅनेजर,
ABC प्रायव्हेट लिमिटेड, पिंपरी,
पुणे.

विषय : पगारवाढीच्या विनंतीबाबत.

आदरणीय सर,

मी सागर पाटील तुमच्या कार्यालयात गेल्या तीन वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहे. मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणे आणि कठोर परिश्रमाने करत आहे आणि अनेक प्रसंगी मी माझी योग्यता सिद्ध केली आहे.

गेल्या ६ महिन्यांपासून मी माझे काम करत असताना ऑफिसमधील काही इतर काम सुद्धा करत आहे आणि जोपर्यंत नवीन कर्मचारी पदाचा कार्यभार घेत नाही तोपर्यंत ते करत राहीन. मला आता १०००० रुपये मासिक पगार मिळत असला तरी माझा पगार वाढला नाही. मला २ मुले असून दोन्ही मुले शाळेत आहेत. माझा घरचा खर्च, मुलांची शाळेची फी आणि सर्व ताळमेळ करताना खूप अडचण होत आहे.

वरील बाबी लक्षात घेता, मी विनंती करू इच्छितो की किमान २०% वाढीचा विचार केला जावा. यासाठी मी तुमचा सदैव आभारी राहीन.

आपला आभारी.

तुमचा विश्वासू,
सागर पाटील.
संपर्क क्रमांक: XXXXXXXXXX

शिक्षकांच्या पगार वाढीसाठी अर्ज

प्रति,
मुख्याध्यापक,
माध्यमिक शाळा, पिंपरी,
पुणे.

विषय : पगारवाढीच्या विनंतीबाबत.

आदरणीय सर,

मी तुमच्या शाळेत दोन वर्षांपासून काम करत आहे. शाळेत शिकविण्याचे काम मी माझ्या मेहनतीने आणि पूर्ण प्रामाणिकपणे केले आहे. गेल्या २ महिन्यांपासून इतिहासाचे शिक्षक नसल्यामुळे मी माझा मराठी विषय सोबत अतिरिक्त इतिहासाचा विषय सुद्धा सर्व मुलांना शिकवत आहे आणि जोपर्यंत नवीन शिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारत नाही तोपर्यंत ते करत राहीन.

मला सध्या १८००० मासिक पगार मिळत असला तरी वाढ झालेली नाही. मात्र, या वाढत्या महागाईमुळे कुटुंब चालवणे कठीण झाले आहे. नुकतेच माझे लग्न झाले त्यामुळे मला तिथे जास्तीचा खर्च करावा लागला.

पगारवाढीसाठी तुम्ही माझा विचार केलात तर मी आभारी आहे कारण मला गेल्या दोन वर्षांपासून पगारवाढ मिळाली नाही. मला तुमच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे, धन्यवाद.

आपला नम्र,
सागर पाटील,
वर्गशिक्षक,
माध्यमिक शाळा, पिंपरी,
पुणे.

१ वर्षाच्या कामानंतर पगार वाढीसाठी अर्ज

प्रति,
प्रताप पाटील,
एचआर मॅनेजर,
ABC प्रायव्हेट लिमिटेड, पिंपरी,
पुणे.

विषय : पगारवाढीच्या विनंतीबाबत.

आदरणीय सर,

मी सागर पाटील, तुम्हाला सांगू इच्छितो कि मी सिनियर अकाउंटंट म्हणून आपल्या कंपनीमध्ये येऊन मला १ वर्ष होऊन गेले आहे. मी माझ्या नोकरीच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी माझे सर्वोत्तम प्रयत्न करत आहे आणि मला भविष्यातही असेच चालू ठेवायचे आहे.

माझ्या पगाराचा आढावा घेण्याची विनंती करण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. मी हे तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की मला कमी पगारावर नियुक्त करण्यात आले होते आणि १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मला वाढीचे वचन देण्यात आले होते आणि आता मी यशस्वीरित्या कार्यकाळ पूर्ण केला आहे.

पगारवाढीसाठी तुम्ही माझा विचार केलात तर मी आभारी राहीन, कारण माझा सध्याचा पगार माझ्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी कमी आहे.

आपला आभारी.

तुमचा विश्वासू,
सागर पाटील.
संपर्क क्रमांक: XXXXXXXXXX

निष्कर्ष

तर हा होता पगारवाढीचा अर्ज कसा लिहावा माहिती लेख. मला आशा आहे की आपणास पगारवाढीचा अर्ज कसा लिहावा हा मराठी माहिती लेख (salary increment application in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

2 thoughts on “पगारवाढीचा अर्ज कसा लिहावा, Salary Increment Application in Marathi”

  1. मी ग्रामपंचायत कर्मचारी असून पगारवाढ साठी विनंती अर्ज कुठे करावा

    Reply
  2. पदनाम बदल करण्याबाबत व पगार वाढण्यासाठी अर्ज

    Reply

Leave a Comment