आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संत सावता माळी मराठी माहिती निबंध (Sant Savata Mali information in Marathi). संत सावता माळी हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी संत सावता माळी मराठी माहिती निबंध (Sant Savata Mali information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.
संत सावता माळी माहिती मराठी, Sant Savata Mali Information in Marathi
संत सावता माळी हे हिंदू संत होते. ते नामदेवांचे समकालीन आणि विठोबाचे भक्त होते.
परिचय
आपल्या महाराष्ट्राची भूमी हि संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. इथे जन्माला आलेल्या अनेक संतांमध्ये पांडुरंग हाच माझा संसार आहे असे ज्यांनी मानले त्यातील एक महत्वाचे संत म्हणजे संत सावता माळी. संत सावता माळी हे एक मराठी संतकवी होते. जन्माने माळी असून सुद्धा त्यांनी आपल्या बाग बागायती सोबतच पांडुरंगाची भक्ती सुद्धा केली.
संत सावता माळी यांचा जन्म
संत सावता माळी यांचा जन्म १२५० साली महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जवळील अरण या गावी झाला. आर्थिक कारणास्तव, त्याचे आजोबा, देवू माळी, सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब जवळ असलेल्या अरणगाव येथे गेले. देवू माळी यांना परसू सावताचे वडील आणि डोंगरे असे दोन मुलगे होते. परसूने नंगीता बाईशी लग्न केले; ते गरिबीत जगले, पण एकनिष्ठ भागवत अनुयायी राहिले. डोंगरे यांचे तरुण वयात निधन झाले. परसू आणि नंगीताबाई यांना एक मुलगा झाला, ज्याचे नाव त्यांनी सावता माळी ठेवले.
संत सावता माळी यांचे जीवन
धार्मिक कुटुंबात वाढलेल्या सावताने जनाबाई नावाच्या जवळच्या गावातील एका अत्यंत धार्मिक महिलेशी सावता माळी यांचे लग्न झाले. अरण गावात शेतात काम करताना सावता माळी विठोबाचा महिमा गात असत. सावता माळी यांना विठोबाच्या मंदिराची यात्रा करता येत नसल्याने विठोबा त्यांच्याकडे आला असा त्यांचा विश्वास होता. सासरच्या भेटीकडे दुर्लक्ष केल्यावर त्याने एकदा आपल्या बायकोचा राग काढला कारण तो त्याच्या भक्तीमध्ये खूप व्यस्त होता, परंतु सावताच्या दयाळू आणि शांत शब्दांमुळे जनाबाईचा राग चटकन शांत झाला.
ते भगवान विठ्ठलाचे महान भक्त होते, त्यांच्या शेतात काम करताना त्यांनी विठ्ठलाचा महिमा गायला. इतर भक्तांप्रमाणे पंढरपूरला जाता येत नसल्याने भगवान विठ्ठल त्यांना अरण गावात भेटायला आले. बैलजोडी घेऊन, पावसात किंवा शेतात त्यांनी खूप कष्ट कष्ट केले, सर्व वेळ भगवान विठ्ठलाचा महिमा गात, सावता माळी यांना प्रत्येक गोष्टीत देव दिसला, तो कोबी, बटाटा, कांदा असू द्या.
म्हणून यावर त्यांचा एक गाजलेला अभंग आहे.
‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’
‘कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी’’
’’लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||’
संत सावता माळी यांचे कार्य
संत सावता माळी स्वतः पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना पाणी, भाकरी, फळे, फुले देऊन त्यांची पूजा करत असत. आपल्या रोजच्या कमावले त्यांना पंढरपूल जाणे शक्य नव्हते. आपला मळा हेच माझे पंढरपूर असे ते नेहमी म्हणत असत. रोज मळ्यात कष्ट करणे, लागणाऱ्या भाज्या आणि फळे पिकवणे, वाटसरूला आपल्यातील थोडे जेवण देणे हीच पांडुरंगाची पूजा आणि भक्ती आहे असे ते म्हणत असत. स्वतः भगवान पांडुरंग माझ्या शेतात राहतो असे म्हणणारे सावता माळी कधीच पंढरपूरला गेले नाहीत. असे बोलले जाते कि स्वतः पांडुरंगच सावळा माळी यांना भेटायला त्यांच्या घरी जात असे.
संत सावता माळी यांनी आपले शेतीचे काम करत वारकरी पंथाचे, धार्मिक प्रबोधनाचे कार्य केले. संत सावता माळी यांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार यांचा मेळ घातला.
संत सावता माळी यांचे अभंग
‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’
‘कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी’’
’’लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||’
आपल्या कामामुळे पांडुरंगाला पाहायला पंढरपूरला जाता येत नसल्यामुळे सावता माळी यांनी आपला मला यालाच पंढरपूर मानले आहे.
‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।’
‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’
या ओळींतून त्यांची आपल्या जीवनाबद्दलची निष्ठा स्पष्ट होते. त्यांच्या अभंगांत नवरसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्य-भक्ती हे रस आढळतात.
‘योग-याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।।
तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।।
नामसंकीर्तनावर त्यांनी जास्त भर दिला. पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी सर्व त्याग करून घेणायची गरज नाही तर आपण प्रपंच करत असताना सुद्धा पांडुरंगाला भेटू शकते असे त्यांचे मत होते.
‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग
मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’
आपले काम करत करत सुद्धा पण पांडुरंचे नामस्मरण करू शकतो, आपला संसार, आपला मळा, विहीर यातच आपली पंढरी आहे असे ते म्हणतात.
संत सावता माळी यांच्याबद्दल प्रसिद्ध आख्यायिका
संत सावता माळी यांच्याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. एकदा संत ज्ञानदेव, नामदेव आणि भगवान पांडुरंग हे पैठणच्या कुर्मदास नावाच्या आपल्या भक्ताला भेटायला निघाले होते. वाटेने जात असताना त्यांना अरणभेंडी हे गाव लागले. पांडुरंगाला सावता माळी याची गंमत करण्याची इच्छा झाली.
भगवान पांडुरंग धावत धावत येऊन सावता माळी यांना म्हणाले कि माझ्या मागे चोर लागले आहेत, मला कुठेतरी लपवून ठेव. तेव्हा सावता माळी म्हणजे हे देवा तु तर सगळीकडे आहेस, आता तुला कुठे लपवू कि तिथून दिसणार नाहीस. पांडुरंग म्हणजे मला तुच्या पोटात लपव.
त्याचबरोवर सावता माळी यांनी आपल्या हातातील खुरपे घेऊन आपले पोट फाडले व पांडुरंगाला आपल्या पोटात लपवून ठेवले. भगवान पांडुरंगाला शोधात शोधात संत ज्ञानदेव आणि संत नामदेव महाराज सावता माळी जवळ आहे आणि त्यांनी सावता माळी यांना विचारले कि आमचा देव तू पाहिला आहेस का? संत नामदेव यांनी केलेल्या प्रार्थनेमुळे पांडुरंग सावता माळी यांच्या पोटातून बाहेर आले.
संत सावता माळी यांचे निधन
संत सावता महाराज हे आपल्या वयाच्या पन्नाशीत आजारी पडले. आजारी पडल्यावर त्यांनी नामस्मरण चालू करत सर्व गोष्टींचा त्याग केला. त्यांचे अरण या गावी १२९५ मध्ये निधन झाले.
अरणभेंडी या गावात सावता माळी यांच्या शेतातच त्यांचे समाधीमंदिर बांधण्यात आले आहे. सावता माळी यांनी आपल्या मळ्यात जिथे आपला देह ठेवला तिथेच त्यांच्या स्मृर्ती जतन करून ठेवल्या आहेत. अरणभेंडी या त्यांच्या गावी त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळा दरवर्षी साजरा केला जातो.
निष्कर्ष
कर्तव्य असणे आणि आपले कर्तव्य करणे अशी प्रवृत्ती खरी श्रद्धा शिकवणारे संत श्री सावता महाराज आहेत. वारकरी समाजात ते थोर व ज्येष्ठ संत म्हणून लोकप्रिय आहेत. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. स्वतः पांडुरंग त्यांना भेटायला आला होता.
परम शुद्धता, तत्वज्ञान, सदाचार, निर्भयता, नैतिकता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी स्तुती केली. भगवंताला प्रसन्न करायचे असेल, तर योगरिया-जप, तीर्थव्रत, व्रतवैकल्य यांची अजिबात गरज नाही. फक्त ईश्वराचे मनापासून चिंतन करावे लागते यावर त्यांनी भर दिला.
तर हा होता संत सावता माळी मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास संत सावता माळी हा निबंध माहिती लेख (Sant Savata Mali information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.