कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन याच्या दरात कपात, कोरोना लसीचे नवीन दर तुम्हाला माहित आहेत का?

Covishield, Covaxin Vaccination price – सीरम इन्स्टिट्यूटनंतर आता भारत बायोटेकनेही आपल्या लसीचे दर कमी करण्याची घोषणा केली आहे. भारत बायोटेक कोव्हॅक्सिन या लसीची विक्री करीत आहेत. कोव्हॅक्सिन सर्व राज्यांना प्रति डोस ४०० रुपये दराने विकले जातील असे कंपनीने म्हटले आहे. यापूर्वी ही किंमत प्रति डोस ६०० रुपये होती. देशभरात १ मे पासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. यापूर्वी ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन सर्व राज्यांना प्रति डोस ४०० रुपये दराने विकले जातील.

Corona Vaccine Rates in Maharashtra

लसीकरणाच्या या तिसऱ्या टप्प्यात राज्य सरकार आणि खासगी रुग्णालये त्यांच्या स्तरावर कंपन्यांकडून थेट लस खरेदी करून १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लसी देऊ शकतात. सीरम संस्थेने कोविशिल्डची किंमत राज्यांसाठी ४०० रुपये आणि खासगी केंद्रांसाठी ६०० रुपये निश्चित केली आहे. या आधी भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनची किंमत राज्यांसाठी ६०० रुपये आणि खासगी केंद्रांसाठी १२०० रुपये निश्चित केली होती.

बुधवारी लसीच्या वेगवेगळ्या किंमती आणि केंद्र सरकारच्या सूचनेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर सीरम संस्थेने कोव्हिशल्डची किंमत राज्यांसाठी डोस ३०० रुपये करण्याची घोषणा केली. त्यानंतर भारत बायोटेक सर्व राज्यांना प्रति डोस ४०० रुपये दराने विकले जातील असे सांगतिले आहे. हे सर्व दर राज्यांसाठी असले तरी अजून सुद्धा दोन्ही कंपन्यांनी खासगी केंद्रांना दिल्या जाणाऱ्या लसीच्या किमतीमध्ये कपात केली नाही.

हे सुद्धा वाचा: कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार; कशी कराल नोंदणी?

तत्पूर्वी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बुधवारी राज्यांतील लसांच्या किंमती कमी केल्या. राज्यांना आता प्रति डोस 300 रुपये दराने सीरम संस्था लस देण्यात येणार आहे. यापूर्वी, सीरमने आपल्या लसांची किंमत दरडोई Rs०० रुपये मोजली होती. विविध कंपन्यांनी लसींच्या दराबाबत भेदभाव केल्याचा आरोप अशा वेळी दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या लसींच्या किंमती कमी केल्या आहेत.

देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून रोज नवे नवे आकडे समोर येत आहेत. कोरोनाची दुसरी लाट देशांत भीतीचे वातावरण निर्माण करत आहे आणि दररोज तीन लाखाहून कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाने पुन्हा एकदा विक्रम मोडला आहे. गेल्या एक दिवसात देशात कोरोनाचे ३.८६ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे ३,८६,४५२ नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासात कोरोना संक्रमणामुळे ३४९८ रुग्णांचा मृत्यू झाला.

आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १,८७,५४,९२५ झाली असून मरण पावलेल्या लोकांची संख्या वाढून २,०८,३१३ आहे. सध्या देशात ३१,६९,१६९ कोरोना रुग्ण सक्रिय असून २,८७,०८१ लोकांना रुग्णालयातूनही घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या लोकांची संख्या १,५३,६९,३६२ आहे.

Leave a Comment