कपिल देव माहिती मराठी, Kapil Dev Information in Marathi

आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कपिल देव यांच्याबद्दल माहिती मराठी भाषेत (Kapil Dev information in Marathi). कपिल देव यांच्या जीवनावरील हा माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी कपिल देव यांच्यावर मराठीत माहिती (Kapil Dev biography in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या खेळामध्ये असलेल्या प्रसिद्ध खेळाडूंची माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे, ते लेखसुद्धा आपण आपण वाचू शकता.

कपिल देव माहिती मराठी, Kapil Dev Information in Marathi

कपिल देव रामलाल निखंज हे एक माजी भारतीय क्रिकेटपटू आहेत. आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे ते एक वेगवान मध्यमगती गोलंदाज आणि उत्कृष्ठ फलंदाज होते.

पूर्ण नावकपिल देव रामलाल निखंज
जन्म6 जानेवारी 1959, चंदीगड , पंजाब
टोपणनावकपिल पाजी
वडिलांचे नावराम लाल निखंज
आईचे नाव राजकुमारी
बायकोचे नाव रोमी भाटिया
विशेषताउजवा हात जलद-मध्यम गोलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज
क्रिकेट पदार्पण 1 ऑक्टोबर 1978, पाकिस्तान विरुद्ध.
खेळलेले सामनेकसोटी - 131, एकदिवसीय - 225, प्रथम श्रेणी - 275
केलेल्या धावा कसोटी - 5,248, एकदिवसीय - 3,783, प्रथम श्रेणी - 11,356
शतके/अर्धशतकेकसोटी - 8/27, एकदिवसीय - 1/14, प्रथम श्रेणी - 18/56
सर्वोच्च धावसंख्याकसोटी - 163, एकदिवसीय - 175*, प्रथम श्रेणी - 193
विकेट्सकसोटी - 434, एकदिवसीय - 253, प्रथम श्रेणी - 835
एका डावात 5 विकेटकसोटी - 23, एकदिवसीय - 1, प्रथम श्रेणी - 39
एका सामन्यात 10 विकेटकसोटी - 2, एकदिवसीय - 0, प्रथम श्रेणी - 3
सर्वोत्तम गोलंदाजी कसोटी - 9/83, एकदिवसीय - 5/43, प्रथम श्रेणी - 9/83

परिचय

कपिल देव यांना महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जाते. आपल्या भारतीय संघाला लाभलेले आतापर्यंतचे एक महान कर्णधार म्हणूनही त्यांना मानले जाते. १९८३ मध्ये आपले पहिले क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे त्यांनी नेतृत्व केले होते. २००२ मध्ये विस्डेनने त्याला शतकातील सर्वात चांगला भारतीय क्रिकेटपटू म्हणून नाव दिले.

Kapil Dev Information in Marathi

एके काळी ते कसोटी आणि एकदिवसीय या दोन्ही प्रमुख प्रकारांमध्ये सर्वाधिक सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू होते. २०० एकदिवसीय विकेट घेणारे ते पहिला खेळाडू आहेत. क्रिकेटच्या इतिहासातील ते एकमेव खेळाडू आहे ज्यांनी ४०० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत आणि कसोटी सामन्यात ५००० हून अधिक धावा केल्या आहेत.

वैयक्तिक जीवन

कपिल देव यांचे पूर्ण नाव कपिल देव रामलाल निखंज होते. त्यांचा जन्म ६ जानेवारी १९५९ रोजी चंदिगढ मध्ये एका हिंदू कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील राम लाल निखंज एक सागवानी लाकूड व्यापारी होते. त्याच्या आईचे नाव होते. १९८० मध्ये कपिल देव यांनी रोमी भाटियाशी लग्न केले. त्यांना आमिया देव ही मुलगी आहे.

डोमेस्टिक कारकीर्द

कपिल देवने हरियाणाकडून खेळताना नोव्हेंबर १९७५ मध्ये पंजाबविरुद्ध ६ गडी बाद करत हरयाणाकडून प्रभावी पदार्पण केले आणि पंजाबला फक्त केवळ ६३ धावांवर तंबूत धाडले.

१९७६-७७ च्या हंगामात त्याने बंगाल विरुद्ध खेळताना त्याने दुसऱ्या डावात फक्त ९ षटकांत देवने २० धावा देत ८ गडी बाद केले. त्याच्या या गोलंदाजीमुळे बंगालला १९ षटकांत सर्वबाद ५८ धावा करता आल्या.

१९७९-८० च्या रणजी सिजनमध्ये त्याने आपले कारकीर्दीतील पहिले शतक करत १९३ धावा केल्या. उत्तर प्रदेश विरुद्ध हरियाणाच्या कर्णधारपदी म्हणून खेळत असताना झालेल्या पूर्व-उपांत्यपूर्व सामन्यात त्याने पाच बळी घेतले.

१९९०-९१ रणजी सीजनमध्ये हरियाणा मधून खेळताना आपल्या संघाला त्याने विजयी केले. कपिल देवने बंगालविरुद्धच्या उपांत्य सामन्यात १४१ धावा करत आपल्या संघाला ६०५ धावांचा टप्पा गाठून दिला आणि गोलंदाजी करताना ५ गडी बाद केले.

१९९१ चा रणजी फायनलचा सामना हा सर्वांच्या लक्षात राहण्यासारखा होता. त्या वर्षी कपिल देव, चेतन शर्मा, अजय जडेजा आणि विजय यादव हे हरियाणा कडून तर संजय मांजरेकर, विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर हे खेळात होते. दीपक शर्मा १९९, अजय जडेजा ९४ आणि चेतन शर्मा ९८ यांनी हरियाणाला ५२२ धावांचा डोंगर उभा करून दिला. गोलंदाजी करताना हरयाणाच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात मुंबईला 410 धावांवर रोखले. दुसऱ्या डावात हरियाणाने २४२ धावा करत मुंबईला ३५५ धावांचे लक्ष्य दिले. सुरुवातीच्या विकेट्सनंतर वेंगसरकर १३९ आणि आणि तेंडुलकर ९६ यांनी मुंबई संघासाठी पुन्हा संघर्ष केला. तेंडुलकर बाद झाल्यानंतर हरियाणाने १०२ धावांच्या मोबदल्यात अखेरच्या ६ विकेट्स घेतल्या आणि एकदम अटीतटीच्या सामन्यात मुंबईचा पराभव केला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

कपिल देवने १ ऑक्टोबर १९७८ रोजी पाकिस्तानच्या फैसलाबाद येथे कसोटी क्रिकेट सामना खेळात आपला आंतरराष्ट्रीय प्रवास सुरु केला. देवने आपल्या गोलंदाजीत सादिक मोहम्मदची विकेट घेत आपला पहिला बाली घेतला. त्याने त्या मालिकेत ३३ चेंडूत ५० धाव ठोकत तेव्हाचे सर्वात जलद अर्धशतक केले.

कारकिर्दीतील महत्वाचे टप्पे

वेस्ट इंडीज संघाविरुद्धच्या आगामी मालिकेत त्याने फिरोजशाह कोटला, दिल्ली येथे अवघ्या १२४ चेंडूंमध्ये [१२६ धावा केल्या. त्या मेलेत त्याने तब्बल १७ गडी बॅड केले. एकदिवसीय क्रिकेटमधील त्यांचा पहिला सामना पाकिस्तानच्या पूर्वीच्या दौऱ्यात झाला.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत तब्बल २८ गडी बाद करत आपण एक चांगला गोलंदाज असल्याचे त्याने सिद्ध केले. १९८० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर कपिल देव अक्षरशः दुखापतग्रस्त असताना सुद्धा त्याने गोलंदाजी करत अंतिम दिवस खेळण्याची इच्छा दर्शविली आणि धोकादायक ऑस्ट्रेलियाची मधली फलंदाजांची फळी बाद केली. त्याने आपल्या १६ षटकांमध्ये फक्त २८ धावा देत ४ गडी बाद केले आणि भारतासाठी सामना जिंकला.

१९८२-८३ च्या विश्वचषकात कपिल देवाने भारताचे प्रतिनिधित्व केले. कपिल देवने याआधी ३२ सामन्यात ६०८ धावा आणि ३४ बाली अशी सामान्य कामगिरी केली होती.

१ जून १९८३ रोजी नेव्हिल ग्राऊंड, रॉयल टुनब्रिज वेल्स येथे भारताने झिम्बाब्वेचा सामना केला. त्या सामन्यात तळाच्या फलंदाजांसह फलंदाजी करत, रॉजर बिन्नी (२२ धावा) आणि मदन लाल यांच्या मदतीने कपिल देवाने संघाला एका स्थिर धावसंख्येवर नेले. देवने १०० चेंडूत शतक ठोकले. किरमानी (२२ धावा) यांच्यासमवेत कपिल देवने ९ व्या विकेटसाठी नाबाद १२६ धावांची भागीदारी केली. त्या सामन्यात कपिल देव १३८ चेंडूत १७५ धावा करत नाबाद राहिला. तो सामना भारताने ३१ धावांनी जिंकला.

उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लिश क्रिकेट संघाशी झाला. इंग्लंडने बिन्नी आणि अमरनाथ यांच्या नियमित विकेट गमावल्यानंतर तळाच्या फळीसोबत पुन्हा एकदा डाव सावरला. कपिल देवाने ३ विकेट घेत इंग्लंडला २१३ धावांवर रोखले. हा सामना भारताने जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.

वेस्ट इंडीजने भारताला फक्त १८३ धावांवर रोखले. फक्त श्रीकांत हा काही धावा करू शकला. वेस्ट इंडिज ने सुद्धा सावध सुरुवात करत ५७ धावा करत आपले २ गडी गमावले होते. रिचर्ड्सने मदन लालच्या एका पुल शॉटवर मारलेला फटका कपिल देवने २० यार्डपेक्षा मागे धावताना झेल पकडला. हा झेल फायनलमधील टर्निंग पॉइंट झाला. वेस्ट इंडीजचा डाव ५० वर एक गडी बाद ते ७६ धावांवर ६ गडी बाद असा झाला. त्यांचा पूर्ण डाव हा १४० धावांवर आटोपला. हा भारताचा पहिलाच विश्वचषक होता. कपिल देवाने या मालिकेत ३०३ धावा, १२ बळी आणि ७ झेल घेतले होते.

१९८७ च्या क्रिकेट विश्वचषकात त्याला कर्णधारपदावर कायम ठेवले होते. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध २६८ धावा केल्या. तथापि, डाव संपल्यानंतर कपिल देवने पंचांना सांगितले कि डावादरम्यान एक षटकार चुकून चौकार म्हणून दिला. त्या सामन्यात भारत हा फक्त १ धावेने हरला. त्या विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत इंग्लंडकडून पराभूत झाला. भारताच्या पराभवासाठी देवला जबाबदार धरले गेले. त्यानंतर त्याने पुन्हा भारताचे कर्णधारपद सांभाळले नाही.

१९९० च्या दशकाच्या सुरुवातीस देव भारताचा वेगवान गोलंदाज म्हणूनच संघात होता. १९९० च्या लॉर्ड्स कसोटी सामन्यादरम्यान तो भारताला फॉलो-ऑनच्या लक्ष्यातून पार करण्यासाठी ऑफस्पिनर एडी हेमिंग्जला त्याने लागोपाठ चार षटकार मारले होते.

१९९२ च्या क्रिकेट विश्वचषकात त्याने शेवटचा सामना मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात खेळला. जवागल श्रीनाथ आणि मनोज प्रभाकर यासारख्या तरूण प्रतिभेच्या जोरावर त्याने संघात असताना गोलंदाजीचे नेतृत्व केले. १९९४ मध्ये रिचर्ड हॅडलीच्या सर्वाधिक कसोटी बळींचा विक्रम मोडल्यानंतर तो निवृत्त झाला .

मार्च २००४ मध्ये पाकिस्तान भारत दौऱ्यात अगोदर सराव शिबिरात ते गोलंदाजी प्रशिक्षक होते. ऑक्टोबर २००६ मध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली.

२००७ मध्ये देव झी टीव्हीने कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेल्या अपस्टार्ट इंडियन क्रिकेट लीगमध्ये, आयसीएल मध्ये सामील झाले. बीसीसीआयने देव यांच्यासह आयसीएलमध्ये रुजू झालेल्या सर्व खेळाडूंचे पेन्शन रद्दबातल केले. २०१२ मध्ये देव यांनी आयसीएलमधून राजीनामा दिला आणि बीसीसीआयला पाठिंबा दर्शविला.

केलेले रेकॉर्डस्

कसोटी क्रिकेट

 • १९९९ च्या सुरूवातीला रिचर्ड हॅडलीचा विक्रम मोडत सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा खेळाडू
 • एकमेव अष्टपैलू खेळाडू ज्याने ४००० कसोटी धावा आणि ४०० कसोटी विकेट्समध्ये घेतल्या आहेत
 • १८४ डावात कधीच धावबाद न होणारा खेळाडू
 • सर्वात युवा कसोटी क्रिकेटपटू ज्याने १००, २०० आणि ३०० विकेट घेतल्या आहेत
 • कर्णधार म्हणून कसोटी सामन्याच्या डावातील सर्वोत्तम गोलंदाजीची आकडेवारी, ८३ धावा देत ९ बळी
 • कसोटी डावात ९ बळी घेणारा एकमेव कर्णधार

एकदिवसीय क्रिकेट

 • १९७८ ते १९९४ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट्स, २५३
 • वर्ल्ड कपच्या इतिहासात ६ किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक वन डे धावा १८५ नाबाद
 • वनडे इतिहासातील सहाव्या स्थानावर फलंदाजी करताना सर्वाधिक चेंडू खेळणे, १३८

मिळालेले पुरस्कार

 • १९७९-८० मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित
 • १९८२ मध्ये पद्मश्रीपुरस्काराने सन्मानित
 • १९८३ मध्ये विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर
 • १९९१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित
 • २००२ मध्ये विस्डेन शतकातील भारतीय क्रिकेटर
 • २०१० मध्ये आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम
 • २०१३ मध्ये सीके नायडू लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित

मिळालेले सन्मान

 • २००८ मध्ये लेफ्टनंट कर्नल, भारतीय प्रादेशिक सेना
 • २०१९ मध्ये हरियाणाच्या क्रीडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून नियुक्ती

क्रिकेट व्यतिरिक्त जीवन

कपिल देवने दिलगी … ये दिल्लगी, इकबाल, चैन खुली की मैं खुली आणि मुझसे शादी करोगी या सिनेमांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी शैलेंद्र सिंग यांच्यासमवेत वन इंडिया माय इंडिया नावाचे एक गाणे देखील गेले आहे.

भारतीय चित्रपट निर्माते कबीर खान हे ८३ नावाचा चित्रपट काढत आहेत. हा चित्रपट कपिल देव आणि १९८३ मध्ये भारतातील पहिला विश्वचषक कसा जिंकून दिला यावर आहे.

तर हा होता कपिल देव यांच्या जीवनावरील माहिती मराठी भाषेत लेख. मला आशा आहे की आपणास कपिल देव यांच्या जीवनावरील हा माहिती लेख (Kapil Dev information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Related Posts

हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍

आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या नवीन गोष्टींबद्दल माहिती करून घेणे आणि सर्वांपर्यंत पोहचवणे, ब्लॉगिंगची आवड आणि मोकळ्या वेळेचा कुठेतरी चांगल्या ठिकाणी सदुपयोग व्हावा यासाठीच केलेला हा अट्टाहास.

1 thought on “कपिल देव माहिती मराठी, Kapil Dev Information in Marathi”

Leave a Comment

error: Content is protected.