आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अजिंक्य रहाणे यांच्याबद्दल माहिती मराठी भाषेत (Ajinkya Rahane information in Marathi). अजिंक्य रहाणे यांच्या जीवनावरील हा माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी अजिंक्य रहाणे यांच्यावर मराठीत माहिती (Ajinkya Rahane biography in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या खेळामध्ये असेल्या प्रसिद्ध खेळाडूंची माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे, ते लेखसुद्धा आपण आपण वाचू शकता.
अजिंक्य रहाणे माहिती मराठी, Ajinkya Rahane Information in Marathi
अजिंक्य रहाणे हा भारतीय क्रिकेटपटू आणि भारत राष्ट्रीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आहे. सध्या तो कसोटी क्रिकेटमधील भारतीय क्रिकेट संघाचा उप-कर्णधार आहे . तो प्रामुख्याने कसोटी स्वरूपात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळतो.
[table id=3 /]
परिचय
अजिंक्य रहाणे हा उजव्या हाताचा फलंदाज असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त इंडियन प्रीमियर लीग संघ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून आणि दिल्ली संघाकडून खेळला आहे. अजिंक्य रहाणे याने २००७-०८ च्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या हंगामात मुंबई संघातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑगस्ट २०११ मध्ये मॅनचेस्टर येथे इंग्लंड विरुद्ध टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले. रहाणेने मार्च २०२०-२१ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याने कसोटी सामन्यात पदार्पण केले. त्याने आपले पहिले कसोटी शतक वेलिंग्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध खेळताना केले. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियामध्ये २०२०-२१ ची बॉर्डर- गावस्कर हि ट्रॉफी जिंकली आहे.
त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत बऱ्याच संधींचा उपयोग करण्यात अयशस्वी ठरला, विशेषत: मर्यादित षटकांच्या खेळांमध्ये, ज्यामुळे त्याची कसोटीतील शक्यता कमी झाली. अनेक सामन्यानंतर त्याने कसोटी फलंदाज म्हणून आपला क्लास दाखविला आहे, खरं तर कसोटी क्रिकेटमध्ये भारताची नवी ढाल म्हणून जिन्या रहाणेची ओळख आहे.
प्रारंभिक जीवन
अजिंक्य रहाणे याचे पूर्ण नाव अजिंक्य मधुकर रहाणे आहे. यांचा जन्म ६ जून, १९८८ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील आश्वी खुर्द येथे झाला. त्याचे वडील मधुकर बाबुराव रहाणे, बेस्टमध्ये कार्यरत सिव्हिल इंजिनीअर होते. त्यांच्या कुटुंबात त्यांचा धाकटा भाऊ शशांक आणि धाकटी बहीण अपूर्वा आहे. जेव्हा अजिंक्य रहाणे सात वर्षांचा होता, तेव्हा वडिलांनी त्याला डोंबिवलीतील मॅट विकेटसह क्रिकेट शिबिरात नेले होते. पण तेथे त्याला चांगले प्रशिक्षण मिळाले नाही. नंतर त्याने माजी भारतीय कसोटीपटू प्रवीण आमरे यांच्याकडे वयाच्या १७ वर्षा पर्यंत क्रिकेचे प्रशिक्षण घेतले. दररोज रिक्षासाठी पैसे न मिळाल्याने त्याची आई त्याला किटची बॅग व धाकटा भाऊ घेऊन जायला घेऊन तेथे जात असे.
डोंबिवलीतील एसव्ही जोशी हायस्कूलमधून त्यांना माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. जेव्हा त्याला भारतीय कसोटी संघात बोलावले गेले, तेव्हा तो त्याच्या बी.कॉम कोर्सच्या तिसर्या वर्षाचा होता.
अजिंक्य रहाणे याने २६ सप्टेंबर २०१४ रोजी आपली मैत्रीण राधिका धोपावकर हिच्याशी लग्न झाले. ते एकमेकांना लहानपणापासून ओळखत असत. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांना आर्या नावाची एक मुलगी झाली आहे.
क्रिकेट कारकिर्दीस सुरुवात
२००० साली १९ वर्षाखालील संघातून खेळताना रहाणेने चांगली कामगिरी करत २ शतके केली होती. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला नंतर पाकिस्तानमध्ये होणाऱ्या मोहम्मद निसार ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी निवडले गेले.
फर्स्ट क्लास क्रिकेट करिअर
वयाच्या १९ व्या वर्षी सप्टेंबर २००७ मध्ये मोहम्मद निसार चषक स्पर्धेत कराची येथे मुंबईतर्फे खेळताना रहाणेने प्रथम श्रेणीतील क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. रहाणेने साहिल कुकरेजा सोबत डावाची सुरुवात करताना तटाने १४३ धाव केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे रहाणेला इराणी करंडक सामन्यात शीर्ष भारत कडून खेळण्यासाठी रहाणेला निवडले गेले.
रणजी चषकाच्या दुसऱ्या सीजन मध्ये रहाणेने १०८९ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळेच मुंबईला जेतेपदावर नाव कोरता आले. त्याच्या नाबाद २६५ धावांमुळे मुंबईला हैदराबाद विरुद्ध सामना जिंकता आला. रहाणेने त्या वर्षी तीन वेगळ्या मोसमात १००० पेक्षा जास्त धाव केल्या. २०११ च्या राजस्थान विरुद्ध झालेल्या इराणी चषक सामन्यात केलेल्या १५२ धावांमुळे भारताच्या कसोटी संघात त्याची निवड झाली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर
अजिंक्य रहाणेने २०११ मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीस सुरुवात केली.
कसोटी क्रिकेट करिअर
अजिंक्य रहाणेने नोव्हेंबर २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना कसोटी संघात पदार्पण केले. जरी रहाणेला कसोटी संघात घेतले तरी त्याला अजून खेळायला संधी मिळाली नव्हती. त्यासाठी त्याला जवळपास १६ महिने वाट पाहावी लागली.
रहाणेला २२ मार्च २०१३ रोजी फिरोजशहा कोटला स्टेडियम, दिल्ली येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध खेळायला संधी मिळाली. पदार्पणाच्या सामन्यात तो जास्त धावा करू शकला नाही.
पदार्पण सामन्यात अपयशी ठरला असला तरी अजिंक्य रहाणेला २०१३-१४ च्या दक्षिण आफ्रिका दौर्याच्या संघात सामील करण्यात आले. त्याने या वेळी फलंदाजी करताना मधल्या फळीमध्ये येऊन तब्बल २०९ कुठल्या. त्याने ६९ च्या सरासरीने अनेक नामवंत गोलंदाज जसे कि डेल स्टेन , मॉर्न मॉर्केल समोर असताना तडाखेबंद फलंदाजी केली. दक्षिण आफ्रिका दौर्याच्या मालिकेत अजिंक्य रहाणेने तिसर्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
रहाणेने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक वेलिंग्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध १५ फेब्रुवारी २०१४ रोजी खेळताना केले. रहाणे जेव्हा खेळायला आला तेव्हा भारताची अवस्था पाच बाद १५६ अशी होती आणि भारत खूप भारत कठीण स्थितीत होता. अशा वेळी रहाणेने १११ धावांची झुंज दिली.
अजिंक्य रहाणेने इंग्लंडमध्ये इन्व्हेस्टेक कसोटी मालिका सुद्धा खेळला. याआधी त्याने परदेशातील ६१ च्या सरासरीने चार कसोटी सामन्यांमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांसह ३७१ धावा केल्या आणि आपल्या का निवडले याचे उत्तर दिले. सौरव गांगुली, दिलीप वेंगसरकर आणि अजित आगरकर यांच्यासह लॉर्ड्स येथील मैदानावर पहिल्याच सामन्यात कसोटी शतक झळकावणारा अजिंक्य रहाणे हा चौथा भारतीय फलंदाज आहे.
२०१५ च्या श्रीलंका दौर्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात रहाणेने एका कसोटी सामन्यात रहाणेने सर्वाधिक आठ झेल पकडून एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम मोडला. कोलंबो येथे झालेल्या दुसर्या कसोटी सामन्यात रहाणेने आपल्या चौथ्या कसोटी शतकासह दुसर्या डावात तब्बल १२६ धावा केला आणि भारताला तो सामना जिंकून दिला.
२५ मार्च २०१७ रोजी विराट कोहलीला झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात धर्मशाला येथे त्याला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तो भारतीय संघाचा ३३ वा कसोटी कर्णधार झाला. या सामन्यात त्याने पहिल्या डावात ४६ धावा आणि दुसर्या डावात ३७ धावा केल्या. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी सामन्यात त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले.
२०१९ मध्ये वेस्ट इंडिजमधील दोन सामन्यांच्या मालिकेत त्याने पहिल्या कसोटीत शतक झळकावत भारताला विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या झालेल्या मालिकेत त्याने कर्णधार विराट कोहलीबरोबर महत्त्वपूर्ण शतकी भागीदारी करुन दुसर्या कसोटी सामन्यात आपले वैयक्तिक शतक झळकावले होते. याच मालिकेत तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने रोहित शर्माबरोबर २६७ धावांची भागीदारी करत भारताला हा सामना ११५ धावांच्या फरकाने जिंकून दिला.
डिसेंबर २०२० मध्ये विराट कोहलीच्या जागी ऑस्ट्रेलिया दौर्याच्या अंतिम तीन सामन्यांसाठी रहाणेला भारतीय संघाचा कर्णधार करण्यात आले. दुसर्या कसोटीत रहाणेने पहिल्या डावात ११२ धावा केल्या आणि भारताला एक चांगला विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. सिडनी येथे झालेल्या तिसर्या कसोटी सामन्यानंतर, ब्रिस्बेनमध्ये झालेला चौथा कसोटी सामना भारताने जिंकून मालिका २-१ ने जिंकली.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय करिअर
ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना सलग २ सामन्यांमध्ये २ शतके केल्यांनतर रहाणेला इंग्लंड दौर्यासाठी भारत संघाकडून निवडले गेले. सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या जागी इंग्लंडविरुद्ध रहाणे खेळू लागला.
इंग्लंडविरुद्ध त्याने २०११ सालच्या नॅटवेस्ट मालिकेत चांगली कामगिरी केली. या सामन्यात त्याने ४७ चेंडू मध्ये ५४ धावा केल्या. परंतु पुढील अनेक मर्यादित षटकांच्या वेस्ट इंडीज, श्रीलंका, पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये रहाणे अपयशी ठरला. त्याला आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
अशा कामगिरीमुळे त्याला आपले स्थान टिकवणे अवघड होऊ लागले. सप्टेंबर २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध आणि नोव्हेंबर २०१४ मध्ये श्रीलंका विरुद्ध केलेल्या जलद शतकांसह त्याने पुन्हा एकदा ओपनिंगच्या स्थानावर पकड बनवली होती, पण रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या दुसर्या एकदिवसीय द्विशतकानंतर रहाणेला पुन्हा एकदा ३-४ क्रमांकावर येऊन फलंदाजी करावी लागली. त्यानंतर झालेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात सुद्धा रहाणे हवी तशी कामगिरी करू शकला नाही. त्याने ८ सामन्यांत ३४ च्या सरासरीने फक्त २०८ धावा केल्या.
टी २० करिअर
रहाणेने टी-२० क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे ऑगस्ट २०११ मध्ये खेळताना पदार्पण केले. २०१४ च्या वर्ल्ड टी २०च्या अंतिम सामन्यात रहाणे सुद्धा भारतीय संघाचा भाग होता. भारताने सामना जिंकताना उपांत्य फेरीच्या सामन्यात रहाणेने ३२ धावा केल्याने त्याने विजयात मोलाचा वाटा उचलला.
आयपीएल करिअर
रहाणे हा आधी मुंबई इंडियन्सच्या संघात होता पण त्याला तिथे खूप कमी संधी मिळाली. त्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या शेन वॉटसनने त्याचा खेळ आधीच माहित असल्याने त्याला राजस्थान रॉयल्सच्या संघात सामील करून घेतले. रहाणेने राजस्थान रॉयल्सबरोबर कोच राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विजय मिळवले. रहाणे राजस्थान रॉयल्सच्या २०१२ च्या हंगामात आपल्या खेळामुळे खूप प्रसिद्ध झाला. त्याने आयपीएल २०१२ च्या पहिल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध खेळताना ८४ धावा कुटल्या आणि त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध नाबाद १०3 धावांची खेळी केली होती. २०१२ च्या प्रीमियर लीग मध्ये रहाणे हा शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला होता. २०१२ च्या सिजनमध्ये राजस्थान रॉयल्सकडून सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज म्हणून त्याने आपला खेळ दाखवून दिला.
रहाणे हा २०१६ आणि २०१७ च्या हंगामात रायझिंग पुणे सुपरजायंट्स कडून खेळला. २०१६ सालच्या मोसमात रहाणे हा पुणे संघासाठी सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता.
२०१८ मध्ये रहाणेला राजस्थान रॉयल्सने राईट-टू मॅच कार्डचा वापर करून ४ कोटी रुपये खर्च करून परत संघात घेतले. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून स्टीव्ह स्मिथला नियुक्त करण्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या बॉल टेंपरिंग आरोपांमुळे स्टीव्ह स्मिथने कर्णधार म्हणून पद सोडले. त्यानंतर रहाणेने २०१८ सीझनसाठी राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले.
२०१९ च्या सिजनसाठी रहाणे दिल्ली कडून खेळू लागला. आणि आता सुद्धा तो दिल्ली संघाकडूनच खेळात आहे.
केलेले रेकॉर्डस
- रहाणे हा कसोटीच्या प्रत्येक डावात शतक झळकावणारा असा पाचवा भारतीय फलंदाज आहे
- एका कसोटी सामन्यात सर्वाधिक कॅच घेण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे
- आयपीएलमध्ये एका षटकात सहा चौकार मारणारा तो पहिला फलंदाज होता
- आयपीएलमध्ये सर्वात पहिले शतक सुद्धा त्याच्याच नावावर आहे
मिळालेले पुरस्कार
- २००६ मध्ये त्याला वर्षांखालील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हूणन एमए चिदंबरम ट्रॉफी देऊन त्याचा गौरव केला होता
- २०१४-१५ मध्ये त्यांना सिएट इंडियन क्रिकेटर ऑफ दी इयर म्हणून गौरविण्यात आले.
- २०१६ मध्ये अजिंक्य रहाणे यांना अर्जुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तर हा होता अजिंक्य रहाणे यांच्या जीवनावरील माहिती मराठी भाषेत लेख. मला आशा आहे की आपणास अजिंक्य रहाणे यांच्या जीवनावरील हा माहिती लेख (Ajinkya Rahane information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.